ICC Rankings: वनडे क्रमवारीत गिलचा जलवा, बाबर आझम अव्वल स्थानी कायम

ICC Rankings: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली.
Shubman Gill
Shubman Gill Dainik Gomantak
Published on
Updated on

ICC Rankings: टीम इंडियाचा स्टार सलामीवीर शुभमन गिलसाठी एक आनंदाची बातमी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी ताजी क्रमवारी जाहीर केली. या क्रमवारीत गिलला 2 अंकाचा फायदा झाला आहे. गिल आता दोन अंकानी झेप घेत अव्वल 10 फलंदाजांच्या यादीत पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. गिलचे 743 रेटिंग गुण आहेत.

गिलने वेस्ट इंडिजविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 85 धावा केल्या होत्या

वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत शुभमन गिल टीम इंडियाचा (Team India) भाग होता. त्याने अनुक्रमे 7, 34, 85 धावांची खेळी खेळली. ज्याचा फायदा त्याला वनडे क्रमवारीत मिळाला आहे.

Shubman Gill
ICC Rankings: विल्यमसनची बादशाहत धोक्यात, रॅंकिंगमध्ये रुटला जबरदस्त फायदा!

बाबर आझम अव्वल स्थानी

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) (886) ताज्या ICC वनडे क्रमवारीत पहिल्या स्थानी कायम आहे. टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली या यादीत 9 व्या स्थानावर आहे.

टॉप 10 मध्ये भारताचे 2 खेळाडू

दरम्यान, वनडे क्रमवारीत टॉप 10 मध्ये 2 भारतीय खेळाडू आहेत. शुभमन गिल पाचव्या तर विराट कोहलीचे नाव 9 व्या क्रमांकावर आहे. या यादीत पाकिस्तानचे 3 तर ऑस्ट्रेलियाचे 2 खेळाडू आहेत.

Shubman Gill
ICC Women's Rankings: वनडे क्रमवारीत स्मृती मानधनाला मोठा फायदा, हरमनप्रीत कौरची आठव्या स्थानावर घसरण

ICC ODI रँकिंगमधील टॉप 5 खेळाडू

बाबर आझम - 886 रेटिंग गुण

रासी व्हॅन डर डुसेन - 777 रेटिंग गुण

फखर जमान - 755 रेटिंग गुण

इमाम उल हक - 745 रेटिंग गुण

शुभमन गिल - 743 रेटिंग गुण

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com