Babar Azam & Virat Kohli
Babar Azam & Virat Kohli  Dainik Gomantak
क्रीडा

Babar Azam: जागतिक क्रिकेटवर बाबरचा दबदबा, विराट-रोहितला मागे टाकत रचला इतिहास!

दैनिक गोमन्तक

ICC Mens Cricketer Of The Year​: भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि रोहित शर्मा सारख्या महान फलंदाजांना मागे टाकणाऱ्या एका नव्या फलंदाजाचा जागतिक क्रिकेटवर अचानक दबदबा निर्माण झाला आहे. रोहित आणि विराट यांनी अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले, परंतु आता क्रिकेट जगतात पाकिस्तानच्या एका फलंदाजाचा दबदबा वाढत आहे. पाकिस्तानचा घातक फलंदाज बाबर आझमने रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारख्या जगातील दिग्गज फलंदाजांना मागे टाकून इतिहास रचला आहे.

बाबर आझमचा जलवा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पाकिस्तानचा घातक फलंदाज बाबर आझमची (Babar Azam) ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर म्हणून निवड केली आहे. बाबरने 2022 मध्ये धावांचा पाऊस पाडला होता, ज्यामुळे ICC ने त्याला 2023 मध्ये ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर हा सर्वात मोठा पुरस्कार दिला आहे. ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकल्यानंतर बाबर आझमला आता सर गारफिल्ड सोबर्स ट्रॉफी देण्यात येणार आहे.

विराट कोहली आणि रोहित शर्माची राजवट संपली

बाबर आझमने बेन स्टोक्स (इंग्लंड), टिम साऊदी (न्यूझीलंड) आणि सिकंदर रझा (झिम्बाब्वे) यांसारख्या सर्वोत्कृष्ट खेळाडूंनाही ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकण्यासाठी मागे टाकले आहे. ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द ईयर पुरस्कार जिंकणारा बाबर आझम हा पाकिस्तानचा दुसरा क्रिकेटपटू ठरला आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने 2021 मध्ये ही ट्रॉफी जिंकली होती.

तसेच, बाबर आझमने 2022 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. 2022 मध्ये बाबरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 54.12 च्या सरासरीने 2598 धावा केल्या, ज्यात 8 शतके आणि 17 अर्धशतकांचा समावेश आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान T20 विश्वचषक आणि T20 आशिया चषक या दोन्ही स्पर्धेत उपविजेता ठरला होता. 2022 मध्ये, क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये 2000 हून अधिक धावा करणारा बाबर एकमेव फलंदाज होता.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू (वर्ष 2022)

  • 1. बाबर आझम (पाकिस्तान) - 2598 धावा

  • 2. लिटन दास (बांगलादेश) - 1921 धावा

  • 3. श्रेयस अय्यर (भारत) - 1609 धावा

  • 4. मोहम्मद रिझवान (पाकिस्तान) - 1598 धावा

  • 5. स्टीव्ह स्मिथ (ऑस्ट्रेलिया) - 1560 धावा

  • 6. डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) - 1463 धावा

  • 7. सूर्यकुमार यादव (भारत) - 1424 धावा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway Fine Collection: फुकट्यांना कोकण रेल्वेचा दणका, एप्रिलमध्ये 2.70 कोटी दंड वसूल

Goa Crime: रस्ता अडविणे, दंगल माजविणे याप्रकरणी कुंकळ्ळीत 400 भाविकांविरोधात गुन्हा

Defamatory Post Lairai Devi: अन्यथा अस्नोडा जंक्शन रोखणार! भाविकांची म्हापसा पोलिस स्थानकावर धडक

Madgaon Station News: कोकण रेल्वेची मडगाव येथे रेंट अ बाईक सुविधा; विजय सरदेसाईंचा कडाडून विरोध, आंदोलनाचा इशारा

आम्ही गप्प बसू शकत नाही...अल्पवयीन मुलीच्या गर्भपातास कोर्टाची परवानगी

SCROLL FOR NEXT