Babar Azam: बाबर आझम अडकला हनी ट्रॅपमध्ये? पर्सनल व्हिडिओ अन् फोटो व्हायरल

Pakistan Cricket Captain Babar Azam: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या एका वेगळ्या टप्प्यातून जात आहे.
Babar Azam
Babar AzamDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Cricket Captain Babar Azam: पाकिस्तानी क्रिकेट संघाचा कर्णधार बाबर आझम सध्या एका वेगळ्या टप्प्यातून जात आहे. जिथे त्याच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानी संघाला घरच्या मालिकेत न्यूझीलंड आणि इंग्लंडविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले होते.

दुसरीकडे, सोशल मीडियावर काही पर्सनल व्हिडिओ आणि फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये बाबर आझम दिसत असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे बाबर हनी ट्रॅपमध्ये अडकल्याचा दावाही केला जात आहे.

हे फोटो व्हायरल झाले

@niiravmodi अकाऊंटवरुन हा व्हिडिओ आणि फोटो ट्विटरवर प्रसिद्ध करण्यात आले असून त्यात दिसणारी व्यक्ती बाबर आझम असून तो दुसऱ्या पाकिस्तानी क्रिकेटरच्या प्रेयसीसोबत चॅट करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

या फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही जे केले आहे, ते तुम्हाला परत मिळेल. हे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहेत. मात्र, अद्यापपर्यंत बाबर आझमने याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

Babar Azam
Babar Azam: टीम इंडियाच्या खूंखार 'शत्रू'ला पाकिस्तान देणार मोठी जबाबदारी, बाबर आझम...!

पाकिस्तान संघाची कामगिरी खराब झाली

बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वाखाली पाकिस्तान क्रिकेट संघाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. इंग्लंडविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तानला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला.

पाकिस्तानच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असे घडले आहे. जेव्हा पाकिस्तानला आपल्या भूमीवर क्लीन स्वीपचा सामना करावा लागला. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या (New Zealand) वनडे मालिकेतही त्याला 2-1 असा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यामुळे त्याच्या कर्णधारपदावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.

Babar Azam
Babar Azam: पाक PM यांच्या ट्विटवर बाबर आझमला विचारला प्रश्न, म्हणाला...

तसेच, नजम सेठी पीसीबीचे अध्यक्ष बनल्यानंतर आणि शाहिद आफ्रिदी हंगामी मुख्य सिलेक्टर्स बनल्यानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात अनेक बदल झाले आहेत. शान मसूदकडे संघात उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com