ICC: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) गुरुवारी एक मोठी घोषणा केली. ICC ने पुरुष आणि महिला संघांसाठी समान बक्षीस रक्कम जाहीर केली आहे.
यासोबतच कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) ओव्हर रेटच्या निर्बंधांमध्येही बदल करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील डर्बन येथे आयसीसीच्या वार्षिक परिषदेत समान बक्षीस रकमेचा निर्णय घेण्यात आला.
आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले म्हणाले की, 'क्रिकेटच्या इतिहासातील हा एक महत्त्वाचा क्षण आहे. आयसीसीच्या जागतिक स्पर्धांमध्ये भाग घेणार्या पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंना आता समान स्तरावर पुरुस्कृत करण्यात येईल.
2017 पासून आम्ही समान बक्षीस रकमेपर्यंत पोहोचण्यासाठी दरवर्षी महिला स्पर्धांमध्ये बक्षीस रक्कम वाढवली आहे. यापुढे ICC महिला क्रिकेट विश्वचषक जिंकल्यास पुरुष क्रिकेट विश्वचषक जिंकण्याइतकीच बक्षीस रक्कम मिळेल. T20 विश्वचषक आणि अंडर-19 साठी बक्षीस रक्कम समान राहील.'
ICC महिला T20 विश्वचषक 2020 आणि 2023 च्या विजेत्या आणि उपविजेत्याला अनुक्रमे $1 दशलक्ष आणि $500,000 मिळाले, जे 2018 मध्ये देण्यात आलेल्या रकमेच्या पाचपट आहे.
ICC महिला क्रिकेट विश्वचषक 2022 साठीची बक्षीस रक्कम देखील इंग्लंडमध्ये (England) 2017 च्या आवृत्तीसाठी ऑफर केलेल्या $2 दशलक्ष वरुन $3.5 दशलक्ष झाली आहे. आयसीसीने हा निर्णय मीडिया राइट्स आणि रेवेन्यूअंतर्गत पैसा वाढवल्यानंतर घेतला आहे.
मुख्य कार्यकारी समितीने कसोटी क्रिकेटमधील ओव्हर-रेट निर्बंधांमध्ये सुधारणा केली आहे. सध्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलच्या सुरुवातीपासून लागू होणाऱ्या सुधारित नियमांनुसार, खेळाडूंना प्रत्येक षटक कमी पडल्यास त्यांच्या मॅच फीच्या 5% दंड आकारला जाईल, कमाल दंड 50% पर्यंत मर्यादित असेल.
जर एखादा संघ 80-षटकांचा टप्पा गाठण्यापूर्वी बाद झाला आणि नवीन चेंडू अद्याप आला नसेल, तर कोणत्याही संभाव्य विलंबाची पर्वा न करता, ओव्हर-रेटचा दंड आकारला जाणार नाही. या दुरुस्तीमुळे सध्याची 60 षटकांची मर्यादा संपुष्टात येईल.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.