ICC announced Men's ODI Team of the Year 2023:
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरवर्षी वर्षभरात चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा मिळून प्रत्येक क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम संघ जाहीर केला जातो. त्यानुसार मंगळवारी (23 जानेवारी) आयसीसीने 2023 वर्षातील सर्वोत्तम वनडे पुरुष संघ जाहीर केला आहे.
आयसीसीच्या या वनडे संघात वर्ल्डकप 2023 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळलेल्या म्हणजेच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या मिळून 8 खेळाडूंना स्थान मिळाले आहे. या 8 खेळाडूंमध्ये भारताच्या 6 आणि ऑस्ट्रेलियाच्या 2 खेळाडूंचा समावेश आहे.
भारताच्या रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या सहा खेळाडूंचा आयसीसीच्या सर्वोत्तम 2023 वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. या सहाही जणांनी 2023 वर्षात चांगली कामगिरी केली आहे. रोहितकडे आयसीसीच्या या संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले आहे.
आयसीसीच्या या संघात ऑस्ट्रेलियाच्या ट्रेविस हेड आणि ऍडम झम्पा या दोन खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. याशिवाय दक्षिण आफ्रिकेच्या हेन्रिच क्लासेन आणि मार्को यान्सिन यांची निवड झाली आहे. तसेच न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेललाही या संघात संधी देण्यात आली आहे.
सलामी फलंदाजीसाठी आणि कर्णधार म्हणून निवड झालेल्या रोहितने रोहितने 2023 वर्षात 27 सामन्यांमध्ये खेळताना 2 शतकांसह 1255 धावा केल्या आहेत. तसेच त्याने 27 पैकी 21 सामने नेतृत्व करताना जिंकले.
तसेच रोहितबरोबर शुभमन गिलची सलामीवीर म्हणून निवड झाली. त्याने 2023 वर्षात सर्वाधिक वनडे धावा केल्या आहेत. त्याने 2023 वर्षात 29 सामन्यात 1584 धावा केल्या आहेत.
आयसीसीच्या या संघात तिसऱ्या क्रमांकावर ट्रेविस हेडची निवड केली आहे. हेड वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सामनावीर राहिला होता. त्याने 2023 वर्षात 13 वनडे सामन्यांत २ शतकांसह ५७० धावा केल्या आणि ४ विकेट्स घेतल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर विराटला संधी मिळाली असून त्याने 2023 वर्षात 6 शतकांसह 27 वनडे सामन्यांत 1377 धावा केल्या आहेत.
पाचव्या क्रमांकावर न्यूझीलंडच्या डॅरिल मिचेलला संधी मिळाली असून त्याने २०२३ वर्षात २६ वनडे सामन्यांत 5 शतकांसह 1204 धावा केल्या.
सहाव्या क्रमांकावर आक्रमक फलंदाज हेन्रिक क्लासेनला संधी देण्यात आली आहे. त्याची यष्टीरक्षक म्हणूनही निवड झाली आहे. त्याने 2023 वर्षात 24 वनडे सामने खेळताना ९२७ धावा केल्या आहेत. तसेच यष्टीरक्षण करताना 12 झेल घेतले आहेत आणि 7 यष्टीचीत केले आहेत.
मार्को यान्सिनला अष्टपैलू म्हणून सातव्या क्रमांकावर संधी देण्यात आली आहे. यान्सिनने 2023 वर्षात 20 वनडे सामने खेळताना 33 विकेट्स घेतल्या. तसेच एकदा 5 विकेट्स घेण्याचाही कारनामा केला. याशिवाय त्याने यावर्षात 406 धावाही केल्या.
आठव्या क्रमांकावर फिरकीपटू ऍडम झम्पाचा समावेश करण्यात आला असून त्याने 20 वनडे सामन्यात 38 विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीप यादव, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या भारतीय गोलंदाजांना अनुक्रमे नवव्या, दहाव्या आणि अकराव्या क्रमांकावर संधी मिळाली आहे.
चायनामन गोलंदाज कुलदीपने 2023 वर्षात सर्वाधिक 49 विकेट्स घेतल्या. तसेच सिराजने 25 वनडे सामन्यात 44 विकेट्स घेतल्या, तर वर्ल्डकप 2023 मध्ये चमकलेल्या शमीने 2023 वर्षात 19 वनडे सामन्यांमध्ये 43 विकेट्स घेतल्या.
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डॅरिल मिचेल, हेन्रिच क्लासेन, मार्को यान्सिन, ऍडम झम्पा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, मोहम्मद शमी,
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.