ICC च्या सर्वोत्तम 2023 टी-20 संघात चार भारतीयांना स्थान, सूर्यकुमारकडे कर्णधारपद

ICC T20I Team 2023: आयसीसीसने 2023 मधील सर्वोत्तम टी20 संघ जाहीर केला असून यात चार भारतीय खेळाडूंना स्थान दिले आहे.
Suryakumar Yadav
Suryakumar YadavDainik Gomatak
Published on
Updated on

ICC announced Team of the Year 2023:

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून दरवर्षी शानदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे मिळून प्रत्येक क्रिकेट प्रकारासाठी सर्वोत्तम 11 जणांचा संघ जाहीर केला जातो. त्यानुसार 2023 वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंचा सर्वोत्तम टी20 संघ आयसीसीने जाहीर केला आहे.

आयसीसीच्या 2023 मधील सर्वोत्तम टी20 संघात भारताच्या चार खेळाडूंना संधी मिळाली आहे. यामध्ये यशस्वी जयस्वाल, सूर्यकुमार यादव, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग या चार भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे या संघाचे कर्णधारपद सूर्यकुमारकडे देण्यात आले आहे.

Suryakumar Yadav
IND vs ENG: भारत दौऱ्यातून अचानक मायदेशी परतला इंग्लंडचा धाकड फलंदाज, बदली खेळाडूचीही घोषणा

सूर्यकुमारने 2023 वर्षात शानदार कामगिरी नोंदवली आहे. तो आयसीसी टी२० क्रमवारीतही फलंदाजांच्या यादीत गेल्या अनेक महिन्यांपासून अव्वल क्रमांकावर आहे.

तसेच त्याने 2023 वर्षात काही सामन्यांमध्ये रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्या यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचे नेतृत्वही केले. त्याने 2023 वर्षात 18 टी20 सामने खेळताना 2 शतके आणि 5 अर्धशतकांसह 733 धावा केल्या. आयसीसीच्या 2023 टी20 संघात सूर्यकुमारला चौथ्या क्रमांकावर संधी मिळाली आहे.

यशस्वी जयस्वालनेही 2023 वर्षात 15 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 430 धावा केल्या आहेत. जयस्वालला आयसीसीच्या संघाल सलामीला संधी देण्यात आली आहे.

Suryakumar Yadav
IND vs ENG: विराट पहिल्या दोन कसोटीतून बाहेर, टीम इंडियाला धक्का; BCCI कडून कारण स्पष्ट

याशिवाय गोलंदाजी यादीत फिरकीपटू रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग यांना संधी मिळाली आहे. बिश्नोईने 2023 वर्षात 11 आंतररराष्ट्रीय टी20 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या आहेत. अर्शदीपने 2023 वर्षात 21 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळताना 26 विकेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, चार भारतीय खेळाडूंव्यतिरिक्त आयसीसीच्या टी20 संघात झिम्ब्बावेच्या सिकंदर रझा आणि रिचर्ड एनगवरा या दोन खेळाडूंना संधी मिळाली आहे. तसेच इंग्लंडच्या फिल सॉल्ट, वेस्ट इंडिजच्या निकोलस पूरन, आयर्लंडच्या मार्क एडेर आणि युगांडाच्या अल्पेश रामजानी यांना संधी मिळाली आहे.

आयसीसीचा सर्वोत्तम 2023 टी20 संघ (पुरुष)

  • यशस्वी जयस्वाल, फिल सॉल्ट, निकोलस पूरन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), मार्क चॅपमन, सिकंदर रझा, अल्पेश रामजानी, मार्क एडेर, रवी बिश्नोई, रिचर्ड एनगवरा आणि अर्शदीप सिंग.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com