Alex Hales and Jos Buttler
Alex Hales and Jos Buttler Dainik Gomantak
क्रीडा

ICC Player of the Month: टी20 वर्ल्डकपमध्ये भारताला नडणारा ठरला नोव्हेंबरमधील 'बेस्ट क्रिकेटर'

Pranali Kodre

ICC Player of the Month: आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष आणि महिला खेळाडूचा पुरस्कार जिंकलेल्या क्रिकेटपटूंची नावे सोमवारी जाहीर केली आहेत. नोव्हेंबर महिन्यातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूचा पुरस्कार इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला मिळाला आहे, तर सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार पाकिस्तानच्या सिद्र अमीनला मिळाला आहे.

बटलरने हा पुरस्कार जिंकताना त्याचाच संघसहकारी आदिल राशिद आणि पाकिस्तानच्या शाहिन शाह आफ्रिदीला मागे टाकले. राशिद आणि आफ्रिदी या दोघांनाही बटलरसह पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. तसेच अमीनने नत्थकन चांथम आणि गॅबी लूईस हिला मागे टाकत हा पुरस्कार आपल्या नावे केला.

बटलरची टी२० वर्ल्डकपमध्ये शानदार कामगिरी

नोव्हेंबर महिन्यात बटलरच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने दुसऱ्यांदा टी20 वर्ल्डकप जिंकला होता. या स्पर्धेत बटलरची वैयक्तिक कामगिरीही चांगली झाली होती. त्याने भारताविरुद्ध इंग्लंडला उपांत्य सामना 10 विकेट्सने जिंकून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

त्यावेळी त्याने ऍलेक्स हेल्सबरोबर 170 धावांची नाबाद भागीदारी केली होती. त्याने ही भागीदारी करताना 49 चेंडूत 9 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 80 धावा केल्या होत्या. तसेच त्याने एकूणच नोव्हेंबर महिन्यात 4 टी20 सामने खेळताना दोनवेळा अर्धशतकांना गवसणी घातली होती.

अमीनची विक्रमी खेळी

अमीननेही नोव्हेंबर महिन्यात शानदार खेळ केला. तिने आयर्लंडविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेत 277 धावा केल्या. या मालिकेतील लाहोर येथे झालेल्या पहिल्या सामन्यात तिने 151 चेंडूत 176 धावांची खेळी केली. ही महिला वनडे क्रिकेटमधील पाचव्या क्रमांकाची सर्वोच्च खेळी ठरली. तसेच पाकिस्तान महिला संघाकडून केलेली सर्वोच्च खेळी ठरली.

तसेच तिने याच सामन्यात मुनिबा अली बरोबर सलामीला 221 धावांची भागीदारीही केली. तिने याच मालिकेतील दुसऱ्या सामन्यात नाबाद 91 धावांची खेळी केली होती आणि पाकिस्तानला मालिका जिंकवून देण्यात मोलाचा वाटा उचलला होता.

पुरस्कारासाठी होते मतदान

आयसीसी दरमहिन्याला सर्वोत्तम क्रिकेटपटूंना पुरस्कार देते. यासाठी प्रत्येक महिन्यात चांगली कामगिरी केलेल्या तीन पुरुष आणि तीन महिला खेळाडूंना नामांकन मिळते. त्यानंतर नामांकन मिळालेल्या खेळाडूंना चाहते आणि आयसीसीच्या वोटिंग ऍकेडमीतील सदस्य मतदान करतात. त्या मतांनुसार दरमहिन्याला सर्वोत्तम खेळाडू निवडण्यात येतो.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Police: 25 लाखांची सोन्याची बिस्किटे घेवून झाला फरार; पश्चिम बंगालमधून चोरट्याला अटक!

IndiGo Future Plan: इंडिगोचा मेगा प्लॅन, 100 छोटी विमाने ऑर्डर करण्याची एअरलाइन्सची तयारी

Dhargal Hit And Run Case: धारगळमध्ये तो अपघात नव्हे खूनच! उत्तर प्रदेशच्या दोघांना अटक

Lost From Beach: गोव्यात विविध बीचवरुन पाच मुले बेपत्ता; 'दृष्टी'ने घडवली कुटुंबियांशी पुन्हा भेट

Margao Session Court: वेश्याव्यवसायासाठी महिलांची खरेदी आणि पुरवठा केल्याप्रकरणी एकजण दोषी

SCROLL FOR NEXT