Gujarat Titans Dainik Gomantak
क्रीडा

Video: मी कधीच टीम इंडियातून बाहेर पडलो नाही; हार्दिक पांड्या

गुजरात टायटन्सचा कर्णधार पांड्याने संघासाठी सर्वाधिक धावा करत संघाला चॅम्पियनही बनवले आहे.

दैनिक गोमन्तक

IPL 2022 मध्ये हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) आणि त्याच्या टीमने खुपच चमकदार कामगिरी केली आहे. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) कर्णधार पांड्याने संघासाठी सर्वाधिक धावा करत संघाला चॅम्पियनही बनवले आहे. या कामगिरीचे बक्षीसही त्याला मिळाले आणि तो पुन्हा एकदा टीम इंडियात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरला आहे. (I never left Team India Hardik Pandya)

गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup) त्याला प्रथमच भारतीय संघामध्ये स्थान मिळाले आहे. तंदुरुस्त नसल्यामुळे सिलेक्टर संघात स्थान देत नसल्याचे यापूर्वी अनेकदा सांगण्यात आले आहे. मात्र आता हार्दिकने याबाबत मोठा खुलासा केला आहे. तो म्हणाला की तो सध्या ब्रेकवर आहे.

गुजरात टायटन्सने हार्दिक पांड्यासोबत झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. या व्हिडीओमध्ये हार्दिक पांड्या म्हणाला आहे की, अनेकांना माहित नाही की मला स्वतःहून बाहेर पडलो आहे. हा माझा सर्वस्वी निर्णय होता. पण मला संघातून काढण्यात आले हा गैरसमज होता. तो म्हणाला की मी यासाठी बीसीसीआयचा मनापासून आभारी आहे, कारण त्यांनी मला दीर्घ विश्रांती दिली आणि मला परत येण्यास कधीही भाग पाडले नाही.

जुना हार्दिक परत आला,

पांड्या म्हणाला की, जुना हार्दिक माघारी आला आहे. आता चाहते देखील परत आले आहेत आणि माझी परत येण्याची वेळ देखील आली आहे. बरेच सामने खेळायचे आहेत आणि मी त्याची आतुरतेने वाट पाहत आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांची टी-20 मालिका 9 जूनपासून सुरू होणार आहे. पहिला सामना दिल्ली मध्ये खेळला जाणार आहे. पुढे तो म्हणाला की, आयपीएलमध्ये फ्रँचायझीसाठी मी ज्या प्रकारे कामगिरी केली, मलाही देशासाठी तशीच कामगिरी करायला आवडेल.

हार्दिक पांड्याने टी-20 लीगच्या 15 व्या मोसमात 4 अर्धशतकांच्या मदतीने 487 धावा केल्या आणि 8 विकेट्सही आपल्या नावावर केल्या. फायनलमध्ये 3 विकेट्स घेण्यासोबतच त्याने महत्त्वपूर्ण 34 धावाही ठोकल्या. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-20 विश्वचषक ठरले आहे. अशा स्थितीत या अष्टपैलू खेळाडूची कामगिरी तेथे महत्त्वाची भुमिका बजावणार आहे. 2007 पासून या संघाने T20 विश्वचषकाचे विजेतेपद जिंकलेले नाहीये. ऑस्ट्रेलिया ही या स्पर्धेतील डिफेंटींग चॅम्पियन आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Womens World Cup 2025: पराभवानंतरही संधी! भारतीय महिला संघ सेमीफायनलमध्ये कसा पोहोचणार? संपूर्ण गणित समजून घ्या

Goa Politics: "आमकां नरकासुर म्हणून, स्वताक देव समजू नाकांत", फातोर्डा मेळाव्यातील टीकेवर CM सावंतांचे सडेतोड प्रत्युत्तर; Watch Video

Browser Security Alert: तुमचा डेटा धोक्यात? भारत सरकारचा Chrome आणि Mozilla युजर्सना हाय अलर्ट, हॅकर्सपासून वाचण्यासाठी 'हे' काम लगेच करा

Ashwin on Rohit Virat fitness: "आता वय वाढलंय तर...": रोहित आणि विराटबद्दल अश्विनचं वादग्रस्त विधान Watch Video

Gold Price Today: दिवाळीची धामधुम! सोने आणि चांदीचे भाव गगनाला भिडले की उतरले? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT