R Ashwin Dainik Gomantak
क्रीडा

WTC Final मधून वगळल्याबद्दल आर अश्विनने सोडलं मौन; म्हणाला, 'मी पण योगदान...'

कसोटी चॅम्पियनशीप फायनलमध्ये खेळायला आवडलं असतं, असं सांगताना आर अश्विनने मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Pranali Kodre

R Ashwin on WTC 2023 Final: भारतीय संघाला काही दिवसांपूर्वीच कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध 209 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिग्गज फिरकीपटू आर अश्विनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्यात आले नव्हते. याबद्दल सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांनी टिका केली होती.

आता याबद्दल खुद्द आर अश्विननेच प्रतिक्रिया दिली आहे. अश्विनने इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की 'या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण आहे. आम्ही आत्ताच अंतिम सामना खेळला आहे. मला अंतिम सामन्यात खेळायला आवडला असतं. मी देखील संघ इथपर्यंत येण्यासाठी योगदान दिले आहे.'

तसेच अश्विनने असेही सांगितले की 2021 मध्ये झालेल्या कसोटी चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातही त्याने चांगली गोलंदाजी केली होती आणि 4 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच त्याने 2018-19 नंतर परदेशातही चांगली कामगिरी केली आहे.

अश्विन म्हणाला, '2018-19 नंतर माझी परदेशात चांगलीच कामगिरी राहिली आणि संघासाठी सामने जिंकण्यात मी यशस्वी राहिलो आहे. मी या गोष्टीला कर्णधार किंवा प्रशिक्षकाच्या दृष्टीने पाहात आहे आणि मी त्यांच्या बचावासाठी बोलू शकतो.'

'गेल्यावेळी जेव्हा आम्ही इंग्लंडला गेलो होतो, तेव्हा 2-2 अशी कसोटी मालिकेत बरोबरी झालेली होती. त्यामुळे त्यांना संघात 4 वेगवान गोलंदाज आणि 1 फिरकीपटू असे संयोजन योग्य वाटले असेल. अंतिम सामन्यातही त्यांनी हाच विचार केला असेल.'

'समस्या आणखी एका फिरकीपटूला खेळवण्याची नाही, तर चौथ्या डावातील होती. चौथा डाव कसोटी सामन्यातील खूप महत्त्वाचा पैलू असतो आणि आमच्यासाठी इतक्या धावा करण्यासाठी सक्षम असणे की फिरकीपटूला खेळात मदत होईल, हे पूर्णपणे मानसिकतेवर अवलंबून आहे.'

तसेच अश्विन पुढे म्हणाला, तो याबद्दल फार विचार नाही करत की बाकी लोक काय बोलतात. जर तो कोणत्या गोष्टीत चांगला नसेल, तर तो स्वत: त्याच्यावर टीका करतो. तसेच तो त्यावर काम करेल.

याशिवाय अश्विनने त्याच्या मुलाखतीत असेही सांगितले की त्याला फलंदाज न होण्याची खेद वाटत राहिल.

अश्विनने सांगितले की 'उद्या जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेईल, तेव्हा मला हा खेद राहिल की मी चांगला फलंदाज असूनही मी गोलंदाज म्हणून पुढे जायला नको होते. मला वाटते की गोलंदाज आणि फलंदाजांबरोबर वेगवेगळ्या प्रकारची वर्तन केले जाते. या धारणेशी मी सातत्याने लढण्याचा प्रयत्न केला आहे. पण फलंदाज आणि गोलंदाजांसाठी वेगवेगळे उपाय आणि पद्धती आहेत.'

दरम्यान, अश्विनला भारतीय संघव्यवस्थापनाने इंग्लंडमध्ये वेगवान गोलंदाजीला पोषक वातारण लक्षात घेता अंतिम सामन्यात खेळवले नव्हते. भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये चार वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज असे संमिश्रण खेळवण्यात आले होते. फिरकी गोलंदाज म्हणून रविंद्र जडेजा याला संधी देण्यात आलेली.

कसोटी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर

आर अश्विन सध्या कसोटी क्रमावारीत गोलंदाजांच्या यादीत अव्वल क्रमांकावर आहे. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीत 92 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 474 विकेट्स घेतल्या आहेत. तो कसोटी सर्वाधिक विकेट्स घेणारा भारताचा अनिल कुंबळेनंतरचा (619 विकेट्स) दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT