WTC 2023-25 Cycle: तिसऱ्या पर्वात भारतीय संघ 'या' सहा संघाविरुद्ध खेळणार कसोटी मालिका, वेळापत्रक जाहीर

कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वाचे वेळापत्रक समोर आले असून भारत कोणत्या संघाविरुद्ध सामने खेळणार आहे, जाणून घ्या.
Team India
Team IndiaDainik Gomantak

India’s schedule for WTC 2023-25 Cycle: कसोटी चॅम्पियनशीप 2021-23 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला २०९ धावांनी पराभूत करत विजेतेपद मिळवले. हे कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेचे दुसरे पर्व होते. यापूर्वी 2019-21 दरम्यान पहिले पर्व खेळवण्यात आले होते. आता तिसऱ्या पर्वाचीही घोषणा झाली आहे.

भारतीय संघ कसोटी चॅम्पियनशीपच्या तिसऱ्या पर्वात (2023-25) मायदेशात इंग्लंड, बांगलादेश आणि न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे, तर भारताबाहेर वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहेत.

Team India
Test Championship Format: भारत-ऑस्ट्रेलिया संघात होणार फायनल! पण WTC स्पर्धा खेळवली जाते तरी कशी?

कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 पर्वाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ऍशेस २०२३ मालिकेने सुरुवात होईल. ऍशेस 2023 मालिका 16 जून ते 31 जुलै दरम्यान खेळली जाणार आहे.

या पर्वात साखळी फेरीत एकूण 27 मालिका आणि 68 सामने खेळवले जाणार आहेत. तसेच गेल्या दोन्ही पर्वांप्रमाणे गुणतालिकेतील पहिल्या दोन संघात अंतिम सामना खेळवला जाईल. या पर्वात इंग्लंड सर्वाधिक 22 कसोटी सामने खेळणार आहे, त्यापाठोपाठ ऑस्ट्रेलिया 21 आणि भारत 20 सामने खेळणार आहे.

Team India
घरचे शेर, इंग्लंडमध्ये ढेर! WTC Final मध्ये टीम इंडियाचं कुठे चुकलं? वाचा पराभवाची 5 कारणं

पहिल्या दोन्ही पर्वांप्रमाणेच स्पर्धेत सहभागी असणाऱ्या 9 संघांच्या सामन्यांच्या संख्या सारख्या नसल्या तरी सर्व 9 संघांना तीन मायदेशात आणि ३ परदेशात कसोटी मालिका खेळाव्या लागणार आहेत. या मालिका 2 ते 5 सामन्यांच्या असू शकतात. तसेच संघांच्या विजयी टक्केवारीनुसार गुणतालिकेतील स्थान निश्चित केले जाईल.

भारताच्या कसोटी चॅम्पियनशीप 2023-25 मधील मालिका

  • भारताचा वेस्ट इंडिज दौरा 2023

    12-16 जुलै - पहिली कसोटी, डॉमिनिका

    20-24 जुलै - दुसरी कसोटी, त्रिनिदाद

  • भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 2023-24

    दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत - 2 कसोटी सामने (डिसेंबर 2023 ते जानेवारी 2024)

  • इंग्लंडचा भारत दौरा 2024

    भारत विरुद्ध इंग्लंड - 5 कसोटी सामने (जानेवारी-फेब्रुवारी 2024)

  • बांगलादेशचा भारत दौरा 2024

    भारत विरुद्ध बांगलादेश - 2 कसोटी सामने (सप्टेंबर/ऑक्टोबर 2024)

  • न्यूझीलंडचा भारत दौरा 2024

    भारत विरुद्ध न्यूझीलंड - 3 कसोटी सामने (ऑक्टोबर/नोव्हेंबर 2024)

  • भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा 2024-25

    ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत - 5 कसोटी (नोव्हेंबर 2024 - जानेवारी 2025)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com