ISL Football Dainik Gomantak
क्रीडा

ISL Football: एफसी गोवाचा विजयी रथ 'हैदराबाद'ने रोखला

हैदराबाद एफसी अव्वल स्थानावर कायम

दैनिक गोमन्तक

पणजी: बदली खेळाडू अल्वारो वाझकेझ याने सामन्यातील सहा मिनिटे बाकी असताना पेनल्टी फटक्याचा नेम चुकविला. त्याची जबर किंमत एफसी गोवास मोजावी लागली. इंडियन सुपर लीग (ISL) फुटबॉल स्पर्धेत त्यांना पहिला पराभव पत्करावा लागला, त्याचवेळी गतविजेत्या हैदराबाद एफसीने सलग तिसरा विजय साकारत दहा गुणांसह अव्वल स्थान मिळविले. (Hyderabad FC beat Goa FC in ISL Football tournament)

सामना शनिवारी हैदराबाद येथील जी. एम. सी. बालायोगी स्टेडियमवर झाला. सामन्याच्या 11 व्या मिनिटास स्पॅनिश खेळाडू हावियर सिव्हेरियो याने डाव्या पायाच्या शानदार गोलवर हैदराबाद एफसीला आघाडी मिळवून दिली. बार्थोलोम्यू ओगबेचे याच्या असिस्टवर हा गोल झाला. त्यानंतर प्रकाशझोत यंत्रणा बंद पडल्यामुळे काही काळ खेळ खंडित झाला.

सामन्याच्या अंतिम टप्प्यात एफसी गोवास (FC Goa ) पेनल्टी फटक्याचा लाभ मिळाला. मात्र 84 व्या मिनिटास बदली खेळाडू स्पॅनिश अल्वारो वाझकेझ चेंडूला अचूक दिशा दाखवू शकला नाही, त्यामुळे कार्लोस पेनया यांच्या मार्गदर्शनाखालील संघाला बरोबरी साधता आली नाही.

69 व्या मिनिटास मोरोक्कन नोह सदावी याच्या जागी मैदानात आलेल्या अल्वारोस विश्वास सार्थ ठरविता आला नाही. सामन्याच्या इंज्युरी टाईममध्ये एफसी गोवाच्या एदू बेदिया याला गोल नोंदविण्याची संधी होती, पण प्रतिस्पर्धी गोलरक्षक लक्ष्मीकांत कट्टीमणी दक्ष राहिला.

मानोलो मार्केझ यांच्या मार्गदर्शनाखालील हैदराबाद एफसीने चार लढतीनंतर तीन विजय व एक बरोबरी अशा अपराजित कामगिरीसह दहा गुण प्राप्त केले. त्यांनी ओडिशा एफसीवर एका गुणाची आघाडी घेतली. तिसऱ्या लढतीत पराभूत झाल्यामुळे अगोदरच्या सलग दोन विजयामुळे एफसी गोवाचे सहा गुण कायम राहिले. एफसी गोवा पुढील सामना 3 नोव्हेंबरला जमशेदपूर एफसीविरुद्ध फातोर्डा येथे होईल. हैदराबाद 5 नोव्हेंबरला घरच्या मैदानावर ओडिशा एफसीविरुद्ध खेळेल.

आकडेवारीत सामना

  • 7 आयएसएल लढतीत हैदराबादचे एफसी गोवावर 2 विजय

  • हैदराबादचे एफसी गोवाविरुद्ध सलग 2 विजय

  • एफसी गोवाविरुद्ध हैदराबाद ओळीने 3 सामने अपराजित

  • गतमोसमात हैदराबादची 1-1 बरोबरी व 3-2 फरकाने विजय

  • उभय संघांतील लढतीत आता एकूण 17 गोल

  • हैदराबादच्या हावियर सिव्हेरियोचा यंदा पहिला, तर एकंदरीत 8 गोल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: खरी कुजबुज; मुख्यमंत्र्यांची धावाधाव

Goa Assembly Session: 'अर्थसंकल्प आकड्यांचा खेळ नसून राज्याचे आर्थिक नियोजन'! CM सावंतांनी ठणकावले; काल विधानसभेत काय घडले? वाचा..

Panaji Municipal Elelction: पणजी महानगरपालिकेवर कुणाची सत्ता? निर्णय होणार मतपेटीत बंदिस्त; 48 केंद्रांवर यंत्रणा सज्ज

Rashi Bhavishya: जय हो! चांगली बातमी कानावर पडणार; या राशींसाठी महत्वाचा काळ सुरु

Kendra Drishti Yog 2026: शुक्र-गुरुची गट्टी जमणार, पैसा आणि प्रेम दोन्ही मिळणार! केंद्र दृष्टी योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान

SCROLL FOR NEXT