RCB Dainik Gomantak
क्रीडा

IPL 2023 Playoff Equation: बेंगलोरच्या विजयाने मुंबईच्या अडचणीत वाढ, पाहा कसे आहे RCB साठी समीकरण

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने गुरुवारी सनरायझर्स हैदराबादविरुद्ध दणदणीत विजय मिळवल्यानंतर IPL 2023 प्लेऑफच्या शर्यतीतील आपले स्थान आणखी भक्कम केले आहे.

Pranali Kodre

IPL 2023 Playoff Equation for RCB: गुरुवारी इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला 8 विकेट्सने पराभूत केले. त्यामुळे आता गुणतालिकेत बेंगलोर संघाने चौथा क्रमांक मिळवला असून मुंबई पाचव्या क्रमांकावर घसरले आहेत.

बेंगलोरचे सध्या 13 सामन्यांनंतर 7 विजय आणि 6 पराभवांसह 14 गुण झाले आहेत. मुंबईने देखील 13 सामन्यांनंतर 7 विजय आणि 6 पराभव स्विकारले आहेत. पण बेंगलोरचा नेट रनरेट मुंबईपेक्षा चांगला आहे.

प्लेऑफच्या शर्यतीत बेंगलोरचे स्थान भक्कम

बेंगलोरच्या या विजयाने अनेक संघांसमोरील कठीण केले आहे आहे. सध्या आयपीएल 2023 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये केवळ गुजरात टायटन्स संघाने 18 गुणांसह अव्वल क्रमांक निश्चित करत प्लेऑफमधील स्थान पक्के केले आहे. तसेच दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे आव्हान संपुष्टात आले आहे.

सध्या चेन्नई सुपर किंग्स दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि लखनऊ सुपर जायंट्स तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोन्ही संघांचे प्रत्येकी 15 गुण आहेत. चेन्नई आणि लखनऊ हे दोनच असे संघ आहेत, जे 17 गुणांपर्यंत पोहचू शकतात. त्याचबरोबर जास्तीत जास्त 16 गुणांपर्यंत पोहचण्याची संधी मुंबईव्यतिरिक्त रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या संघांकडेच आहे.

त्याचबरोबर जास्तीत जास्त 14 गुणांपर्यंत पंजाब किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स पोहचू शकतात. त्यामुळे सध्या हे सात संघच प्लेऑफमधील उर्वरित तीन जागांच्या शर्यतीत आहेत.

बेंगलोर समोरील समीकरण

सध्या बेंगलोरला त्यांच्या चांगल्या नेट रनरेटमुळे प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा अधिक आहेत. बेंगलोरला त्यांचा अखेरचा सामना 21 मे रोजी गुजरात टायटन्स विरुद्ध खेळायचा आहे. जर या सामन्यात बेंगलोरने विजय मिळवला आणि त्याचबरोबर मुंबईने त्यांचा अखेरचा साखळी सामना पराभूत झाला, तर बेंगलोर थेट प्लेऑफसाठी पात्र ठरतील.

पण जर बेंगलोरने गुजरात विरुद्ध विजय मिळवला आणि मुंबईनेही त्यांचा अखेरचा सामना जिंकला, तर मात्र नेट रनरेटवर प्लेऑफमधील स्थान निश्चित होईल.

तसेच दुसरा एक पर्याय म्हणजे बेंगलोर आणि मुंबईने त्यांचे अखेरचे साखळी सामने जिंकले आणि जर चेन्नई आणि लखनऊने किंवा दोन्ही संघातील एका संघाने तरी त्यांचा अखेरचा साखळी सामना पराभूत झाला तरी बेंगलोर आणि मुंबई प्लेऑफमधील स्थान निश्चित करू शकतात.

मात्र, जर बेंगलोरने गुजरातविरुद्धचा सामना पराभूत झाला आणि मुंबईने त्यांचा अखेरचा सामना जिंकला, तर मात्र बेंगलोरचे आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे जर बेंगलोरने गुजरातविरुद्धचा सामना पराभूत झाला, तर त्यांना आशा करावी लागेल की मुंबईनेही त्यांचा अखेरचा साखळी सामना पराभूत व्हावा. त्याचबरोबर बेंगलोरचा नेट रन रेट 14 गुण असलेल्या संघांपेक्षा जास्त असावा.

बेंगलोरला दुसरे स्थान मिळवण्याचीही संधी

बेंगलोरला प्लेऑफमध्ये दुसरे स्थान मिळवण्याचीही संधी आहे. जर बेंगलोरने गुजरातविरुद्ध विजय मिळवला आणि मुंबई, चेन्नई आणि लखनऊ या तिन्ही संघांनी जर त्यांचे अखेरचे साखळी सामने पराभूत झाले, तर बेंगलोर सहज दुसरा क्रमांक मिळवू शकतात.

तसेच जरी मुंबईने अखेरचा साखळी सामना जिंकला आणि बेंगलोरनेही गुजरातविरुद्ध विजय मिळवला, तरी त्यांना दुसरे स्थान मिळवण्याची संधी आहे. पण त्यासाठी त्यांना आशा करावी लागेल, की चेन्नई आणि लखनऊ संघांनी त्यांचे अखेरचे साखळी सामने पराभूत व्हावेत आणि मुंबईचा नेट रनरेट त्यांच्यापेक्षा कमी असावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vijay Deverakonda Accident: मोठी दुर्घटना टळली! विजय देवरकोंडाचा कार अपघात, अज्ञात वाहनाने मागून दिली जोरदार धडक VIDEO

IND vs WI: दुसऱ्या कसोटीत जडेजा रचणार इतिहास! कपिल देवच्या 'खास क्लब'मध्ये एंट्रीची नामी संधी; कराव्या लागणार फक्त 'इतक्या' धावा

Viral Video: शाळेला दांडी मारुन रस्त्यावर 'आशिकी'! दोन मुलींसोबत रोमान्स करणाऱ्या पठ्ठ्याचा व्हिडिओ व्हायरल; नेटकरी म्हणाले, 'अशा सडकछाप आशिकांनीच...'

Coldrif Cough Syrup Bans: मुलांचा बळी घेणाऱ्या 'त्या' जीवघेण्या कफ सिरपवर गोव्यात बंदी, 'FDA'कडून आदेश जारी

IND vs PAK मॅचमधील 'या' घटनेनंतर पाकिस्तानी खेळाडू अडचणीत, ICC च्या नियमांचं उल्लंघन करणं पडलं भारी; काय घडलं नेमकं?

SCROLL FOR NEXT