Hotel bookings are on the rise in cities hosting cricket matches during the ICC Cricket World Cup. Dainik Gomantak
क्रीडा

Cricket World Cup मुळे हॉटेल मालकांची चांदी, रूम भाडे 777 ट्क्कांनी वाढले

Ashutosh Masgaunde

Hotel bookings are on the rise in cities hosting cricket matches during the ICC Cricket World Cup:

भारतात पुढील आठवड्यापासून सुरू होत असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचा ज्वर आता वाढू लागला आहे. विश्वचषकादरम्यान क्रिकेट सामन्यांचे आयोजन करणार्‍या शहरांमध्ये हॉटेल बुकिंग वाढत आहे, त्यामुळे हॉटेल रुम्सच्या भाड्यात अनेक पटींनी वाढ झाली आहे.

विशेषत: ज्या शहरांमध्ये भारताचे सामने आयोजित केले जाता आहेत तेथे रुम्सच्या भाड्यात मोठी वाढ झाली आहे. ही माहिती ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील कंपन्यांनी दिली आहे.

MakeMyTrip, Oyo आणि Yatra ऑनलाइनवरील बुकिंग ट्रेंडनुसार, अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि धर्मशाला येथे हॉटेल्सची मागणी वाढली आहे.

“आम्ही आता भारतीय क्रिकेट संघ ज्या शहरांमध्ये खेळणार आहे, त्या सर्व शहरांमध्ये हॉटेल्स आणि होमस्टेसह निवास सुविधांसाठी बुकिंगमध्ये लक्षणीय वाढ पाहत आहोत,” असे MakeMyTrip चे सह-संस्थापक आणि सीईओ राजेश मागो म्हणाले.

ते म्हणाले की, अहमदाबादमध्ये मॅच डे बुकींग जास्त आहे. गेल्या काही दिवसांत हॉटेल आणि होमस्टे बुकिंगमध्ये ऑगस्टमधील दैनंदिन सरासरी बुकिंगच्या तुलनेत 200 टक्के वाढ झाली आहे.

“त्याचप्रमाणे, धरमशालामध्ये मॅच-डे बुकिंग ऑगस्टच्या सरासरी दैनंदिन बुकिंगच्या ६०५ टक्क्यांपर्यंत वाढले आहे,” असे मगो यांनी सांगितले.

“दरम्यान, लखनौमध्ये भारताच्या सामन्यांच्या दिवसाचे हॉटेल दर सरासरी दैनंदिन बुकिंगपेक्षा ५० टक्क्यांनी जास्त आहेत. जसजसे सामन्याचे दिवस जवळ येत आहेत तसतसे हॉटेलच्या खोलीचे भाडे आणखी वाढण्याची अपेक्षा आहे,” असेही मगो म्हणाले.

भाडेवाढीत अहमदाबाद टॉप

"आम्ही विश्वचषक सामन्यांच्या यजमान शहरांमध्ये, विशेषत: अहमदाबाद, हैदराबाद, बेंगळुरू, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये सामान्य मागणीपेक्षा जास्त वाढ पाहत आहोत," असे ओयोच्या प्रवक्त्याने सांगितले.

“विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरच्या बुकिंगमध्ये अहमदाबाद 777 टक्के वाढीसह आघाडीवर आहे,” असे ते म्हणाले.

हैदराबाद, बेंगळुरू आणि दिल्लीतही अनुक्रमे 102 टक्के, 81 टक्के आणि 39 टक्क्यांनी लक्षणीय वाढ झाली आहे, असे ओयोच्या प्रवक्त्याने सांगितले.

सर्वच हॉटेल्सना मागणी

यात्रा ऑनलाइनचे वरिष्ठ उपाध्यक्ष भरत मलिक म्हणाले, “निवासाची मागणी अभूतपूर्व पातळीवर पोहोचली आहे, त्यामुळे किमतीही वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, सामने आयोजित करणाऱ्या प्रमुख ठिकाणांसाठी विमान भाड्यात लक्षणीय वाढ झाली आहे.”

ते म्हणाले की, सामन्यांच्या दिवशी विमान भाडे दोन ते तीन पटीने वाढले आहे तर पंचतारांकित हॉटेलचे भाडे 10-15 पटीने वाढले आहे.

विश्वचषकाच्या यजमान शहरांमधील थ्री-स्टार आणि त्यापेक्षा कमी श्रेणीतील हॉटेलमधील रूमचे दरही दुप्पट झाले आहेत.

अशी रंगणार स्पर्धी

ICC क्रिकेट विश्वचषक 2023 चा पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी गतविजेता इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथे खेळवला जाईल.

१४ ऑक्टोबरला येथे भारत विरुद्ध पाकिस्तानचा बहुप्रतिक्षित सामनाही होणार आहे. स्पर्धेचा अंतिम सामनाही येथे १९ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

SCROLL FOR NEXT