R Ashwin: पिच टेम्परिंग, अनफिट क्रिकेटर... वर्ल्डकपपूर्वी आपल्याच माजी क्रिकेटपटूचे अश्विनवर गंभीर आरोप

R Ashwin: "जर CSK आणि MSD नसते तर त्याला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी आणखी जास्त वाट पाहावी लागली असती, कारण त्यावेळी हरभजन शानदार गोलंदाजी करत होता" असेही माजी गोलंदाजाने म्हटले आहे.
Laxman Sivaramakrishnan had made controversial comments about Ashwin on social media saying pitch tamperer and an unfit cricketer.
Laxman Sivaramakrishnan had made controversial comments about Ashwin on social media saying pitch tamperer and an unfit cricketer.Dainik Gomantak
Published on
Updated on

Laxman Sivaramakrishnan had made controversial comments about Ashwin on social media saying pitch tamperer and an unfit cricketer :

माजी भारतीय क्रिकेटपटू एल शिवरामकृष्णन यांनी खुलासा केला आहे की, फिरकीपटू आर अश्विनने नुकतेच त्याच्या गोलंदाजीबद्दल चर्चा करण्यासाठी त्यांना फोन केला होता. शिवरामकृष्णन यांच्या या खुलाशानंतर अश्विनचे ​​खूप कौतुक होत आहे.

कारण शिवरामकृष्णन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर अश्विनबद्दल काही वादग्रस्त कमेंट केल्या होत्या. यामध्ये ते अश्विनला पिच टेम्परिंग करणारा आणि अनफिट क्रिकेटर असल्याचे म्हटले होते.

माजी क्रिकेटपटू शिवरामकृष्णन यांनी विश्वचषकाच्या भारताच्या संघाबाबत चर्चा करताना भारताकडे चांगला फिरकीपटू नसल्याचे मत व्यक्त केल्याने संपूर्ण प्रकरणाला सुरुवात झाली. जिथे शिवरामकृष्णन यांनी अश्विनवर काही टिप्पण्या केल्या.

शिवरामकृष्णन म्हणाले की, गोलंदाज म्हणून अश्विनचे ​​यश हे मुख्यत्वे भारतातील खेळपट्ट्या त्याच्या गोलंदाजीच्या शैलीला साजेसे असल्यानेच होते. त्यांनी पुढे असा दावा केला की, अशा छेडछाड केलेल्या खेळपट्ट्यांवर कोणताही मूर्ख विकेट घेऊ शकतो आणि अश्विन हा एक साधारण क्षेत्ररक्षक आणि सर्वात अनफिट क्रिकेटर असल्याचा दावाही केला. तो संघावर ओझ्यासारखा आहे, असे शिवरामकृष्णन म्हणाले.

इतकेच नाही तर माजी भारतीय फिरकीपटूने आणखी एक पोस्ट केली, ज्यात त्याने लिहिले आहे की जर तो CSK कडून खेळला नसता तर त्याला टीम इंडियामध्ये सहभागी होण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागली असती.

माजी फिरकीपटूने लिहिले, "जर CSK आणि MSD नसते तर त्याला टीम इंडियाकडून खेळण्यासाठी आणखी जास्त वाट पाहावी लागली असती, कारण त्यावेळी हरभजन शानदार गोलंदाजी करत होता."

शिवरामकृष्णन यांनी नंतर स्वत: अश्विनचा फोन आल्याचा धक्कादायक दावा केला. या संभाषणादरम्यान अश्विनने शिवरामकृष्णन यांच्याशी त्याच्या गोलंदाजीबद्दल चर्चा केली.

माजी क्रिकेटपटूने असेही म्हटले की, अश्विनने शिवरामकृष्णन यांच्या टिप्पण्यांबद्दल ऑनलाइन ट्रोल्सच्या तीव्र प्रतिक्रियेबद्दल आश्चर्य व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com