Pakistan Beats India By 4 Wickets Hong Kong Sixes Dainik Gomantak
क्रीडा

Ind vs Pak: शशांक सिंहची वादळी खेळी व्यर्थ! महामुकाबल्यात पाकिस्तानने मारली बाजी; भारताचा 4 गडी राखून पराभव

Pakistan Beats India By 4 Wickets in Hong Kong Sixes: पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल करत संघाला सोपा विजय मिळवून दिला.

Manish Jadhav

Pakistan Beats India By 4 Wickets Hong Kong Sixes: क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान यांच्यातील थरारक लढत पाहायला मिळाली. 'हाँगकाँग सिक्सेस 2026' स्पर्धेतील ग्रुप-सी मधील बहुचर्चित सामन्यात पाकिस्तानने भारताचा 4 गडी राखून पराभव केला. पाकिस्तानचा कर्णधार अब्बास आफ्रिदीने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

नाणेफेकीच्या वेळी भारतीय कर्णधार कृणाल पांड्याने (Krunal Pandya) सांगितले होते की, या प्रकारच्या लहान फॉरमॅटमध्ये प्रत्येक चेंडू निर्धाव टाकणे हे सोन्यासारखे असून ते विकेट घेण्यासारखेच महत्त्वाचे असते. मात्र, नाणेफेक हारल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाला निर्धारित 6 षटकांत 5 गड्यांच्या मोबदल्यात 88 धावांपर्यंतच मजल मारता आली.

पहिल्यांदा फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली आणि आघाडीचे फलंदाज लवकर बाद झाले. परंतु, त्यानंतर शशांक सिंहने वादळी फलंदाजी करत अवघ्या 11 चेंडूंत 5 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 40 धावांची धडाकेबाज खेळी खेळली. त्याला टी नटराजनने नाबाद 12 तर राहुल त्रिपाठीने 9 धावा करुन साथ दिली. पाकिस्तानकडून अब्दुल समदने सर्वाधिक 2 बळी घेतले, तर मोहम्मद शहजाद आणि अहमद डॅनियल यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. शशांकच्या आक्रमक खेळीच्या जोरावर भारताने पाकिस्तानसमोर 89 धावांचे आव्हान ठेवले होते.

जिंकण्यासाठी मिळालेले 89 धावांचे लक्ष्य पाकिस्तानने अत्यंत आक्रमक फलंदाजी करत 3.5 षटकांतच अवघ्या 2 गड्यांच्या मोबदल्यात 91 धावा करत सहज पूर्ण केले. पाकिस्तानच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांवर सुरुवातीपासूनच हल्लाबोल करत संघाला सोपा विजय मिळवून दिला. भारताला आपल्या गोलंदाजीत नियंत्रण राखता न आल्याने हा सामना गमवावा लागला. या पराभवामुळे स्पर्धेत पुढील टप्प्यावर जाण्यासाठी भारतीय संघाला आगामी सामन्यांमध्ये जोरदार पुनरागमन करावे लागणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy Cricket: कमजोर फलंदाजीमुळे गोवा शरणागत, यंदा रणजी स्पर्धेत तिसरा पराभव; विदर्भ डाव व 27 धावांनी विजयी

Ironman Triathlon 2026: गोव्यात 'आयर्नमॅन'चा थरार! 30 देशांतील 2 हजारांहून अधिक ट्रायथलीट्स मैदानात

PM Kisan Yojana 24th Installment Released: 9.34 कोटी शेतकऱ्यांना मोदी सरकारचं दिवाळी गिफ्ट! पीएम किसानचा 24वा हप्ता जारी; स्टेटस तपासा

ST Reservation: 'एसटी' राजकीय आरक्षणाचा पेच; न्यायालयीन स्थगितीमुळे अंमलबजावणी अनिश्चित

Market Fire Safety: दुर्घटनेनंतरची धावपळ नको, आधीच सज्जता हवी; वास्कोच्या आगीने प्रशासनाला दिलेला इशारा

SCROLL FOR NEXT