India vs England Hockey World Cup 2023
India vs England Hockey World Cup 2023 Dainik Gomantak
क्रीडा

Hockey World Cup 2023: भारत-इंग्लडच्या डिफेन्सने टाळला पराभव! रोमांचक सामन्यात गोलशुन्य बरोबरी

Pranali Kodre

भारतात सुरु असलेल्या हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेत रविवारी डी ग्रुपमधील भारत विरुद्ध इंग्लंड संघात सामना झाला. या सामन्यात गोलशुन्य बरोबरी झाली. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण देण्यात आला आहे. या सामन्यात दोन्ही संघाच्या बचावाने चांगली कामगिरी केली.

या सामन्याच्या अखेरच्या 20 सेकंदात नाट्यपूर्ण घडामोडी घडल्या. इंग्लंडला पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. त्यांनी त्यावर गोल करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. मात्र, त्यावेळी भारतीय बचावाने चांगली कामगिरी करत गोल रोखला. अखेर नियमित कालावधीनंतरही दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने सामना गोलशुन्य बरोबरीत सुटला.

या सामन्यात दोन्ही संघांनी आक्रमण चांगले केले होते. पहिल्याच क्वार्टरमध्ये इंग्लंडने यजमान भारतीय संघासमोर तगडे आव्हान ठेवले. त्यांना पहिल्याच क्वार्टरमध्ये 5 पेनल्टी कॉर्नर मिळाले होते. पण त्यावेळी भारतीय बचावाने चांगली कामगिरी करत इंग्लंड गोल करणार नाही याची काळजी घेतली.

याच क्वार्टरच्या अखेरीस भारतालाही एक पेनल्टी कॉर्नर मिळाला होता. पण त्याचे रुपांतर गोलमध्ये झाले नाही. तसेच पहिल्या क्वार्टरच्या अखेरीस इंग्लंडने गोल करण्याचा प्रयत्न केला होता. पण उपकर्णधार अमित रोहिदासने चांगला बचाव केला. त्यामुळे पहिल्या क्वार्टरमध्ये गोल झाला नाही. दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार हरमनप्रीत सिंग या सामन्यात चांगल्या लयीत दिसत होता.

दुसऱ्या क्वार्टरची सुरुवात इंग्लडने आक्रमण करत केली. त्यांनी दोन पेनल्टी कॉर्नरही मिळवले, पण भारतीय बचावाने पुन्हा चांगला बचाव करत गोल रोखला. दुसऱ्या क्वार्टरमध्ये इंग्लंडने भारतावर नंतर वर्चस्वही राखले होते. पण भारताने अखेरच्या काही मिनिटात 3 पेनल्टी कॉर्नर मिळवत गोलसाठी प्रयत्न केले. पण इंग्लंडच्या बचावाने गोल होण्यापासून रोखले.

तिसऱ्या क्वार्टरपासून भारतीय संघ चांगल्या लयीत दिसला. त्यांनी चेंडूवर अधिक काळ ताबा ठेवला होता. हार्दिक सिंगने चांगला खेळ दाखवला होता. 38 व्या मिनिटाला हार्दिक गोल करण्यासाठी इंग्लंडच्या सर्कलमध्येही प्रवेश केला होता. पण गोल करण्यात अपयश आले.

तिसऱ्या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटात भारताने गोल केला होता. मनदीप सिंग, अभिषेकसह भारतीय संघाने जल्लोषही सुरू केला, मात्र पंचांनी हा गोल अवैध ठरवला. गोल होण्यापूर्वीच फाऊलची शिट्टी वाजल्याने हा गोल नाकारण्यात आला.

अखेरच्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांकडून गोलसाठी चढाओढ पाहायला मिळाली. भारताने अनेकदा इंग्लंडच्या सर्कलमध्ये प्रवेश केला, पण इंग्लंडच्या गोलरक्षकाने भारताला एकही गोल करू दिला नाही. तरी भारताच्या अमित रोहिदास आणि जर्मनप्रीत सिंग या दोघांनाही अखेरच्या क्वार्टरमध्ये ग्रीन कार्ड मिळाल्याने भारताला संघर्ष करावा लागला. पण तरीही भारतीय खेळाडूंनी इंग्लंडला गोल करू दिला नाही. अखेर हा सामना बरोबरीत सुटला.

हॉकी वर्ल्डकप 2023 स्पर्धेतील ग्रुप डीमध्ये अव्वल स्थान मिळवण्याच्या दृष्टीने हा सामना दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा होता. पण सामन्यात बरोबरी झाल्याने दोन्ही संघांचे आता प्रत्येकी 2 सामन्यांनंतर 4 गुण झाले आहेत. मात्र, गोलफरकामुळे सध्या इंग्लंड अव्वल स्थानी आहे, तर भारत दुसऱ्या स्थानी आहे.

आता भारताचा तिसरा साखळी सामना वेल्सविरुद्ध 19 जानेवारीला होणार आहे. या सामन्यात विजय मिळवून भारतीय संघ अव्वल स्थान मिळवण्याचा प्रयत्न करू शकतो. पण आता अव्वल स्थानासाठी इंग्लंड विरुद्ध स्पेन यांच्यात 19 जानेवारीलाच होणाऱ्या सामन्याचा निकालही महत्त्वाचा ठरणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa BJP: प्रतापसिंह राणे यांचा श्रीपादना पाठिंबा, मी संघाची विचारधारा स्वीकारली; विश्वजीत राणे

Goa Today's Top News : राणेंचा गौप्यस्फोट, लोकसभा, राजकारण, अपघात; राज्यातील ठळक बातम्या एका क्लिकवर

Workers March Goa: पोटावर लाथ मारणारे सरकार हवे कशाला? फार्मा कंपन्यांवरील एस्मा मागे घ्या; पणजीत कामगारांचा एल्गार

Zero Shadow Day: सावली गोमन्तकीयांची साथ सोडणार; राज्यात अनुभवता येणार झिरो शाडो

Goa News: गोव्यात वेश्याव्यवसायिक 12 महिलांना मिळाला मतदानाचा अधिकार

SCROLL FOR NEXT