Indian Men’s Hockey Team for FIH Hockey Pro League: सोमवारी हॉकी इंडियाने आगामी 26 मे पासून युरोपमध्ये सुरु होणाऱ्या एफआयएच हॉकी प्रो लीगसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा केली आहे. या संघात 24 खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
हॉकी प्रो लीगमध्ये यापूर्वी भारतात जी फेरी खेळली गेली, त्यात भारतीय संघ जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपराजीत राहिला होता, ज्यामुळे भारताला गुणतालिकेत फायदा झाला आहे. आता भारतीय संघ हीच लय युरोपमध्येही कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघ युरोपमध्ये बेल्जियम आणि ग्रेट ब्रिटनविरुद्ध लंडनमध्ये सामने खेळणार आहे, तर नेदरलँड्स आणि अर्जेंटिना यांच्यात आइंडहोव्हन येथे सामने होणार आहेत. भारतीय हॉकी संघाचे प्रशिक्षक म्हणून नियुक्त झालेल्या क्रेग फुल्टन यांचा हा संघाबरोबर पहिलाच दौरा असणार आहे.
या स्पर्धेत युरोपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व डिफेंडर हरमनप्रीत सिंग करेल, तर उपकर्णधारपद हार्दिक सिंग याच्याकडे असेल. तसेच भारतीय संघात गोलकिपर कृष्णा बाहादूर पाठकचे पुनरागमन झाले आहे. तसेच संघात अनुभवी गोलकिपर पीआर श्रीजेशही असणार आहे.
याशिवाय डिफेंडर्समध्ये स्थान मिळालेल्या खेळाडूंमध्ये हरमनप्रीतबरोबरच अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, संजय आणि मनदीप मोर हे पेनल्टी कॉर्नर स्पेशालिस्ट आहेत. मिडफिल्डरमध्ये उपकर्णधार हार्दिक सिंगबरोबर दिलप्रीत सिंग, मोइरंगथेम रविचंद्र सिंग, शमशेर सिंग, आकाशदीप सिंग आणि विवेक सागर प्रसाद यांना संधी मिळाली आहे.
फॉरवर्ड्समध्ये सिमरजीत सिंगचे दुखापतीनंतर पुनरागमन झाले आहे. तसेच अभिषेक, ललीत कुमार उपाध्याय, एस कार्ती, गुरजंत सिंग, सुखजीत सिंग, राज कुमार पल आणि मनदीप सिंग या खेळाडूंचाही समावेश आहे.
गोलकिपर - कृष्ण बहादूर पाठक, पीआर श्रीजेश
डिफेंडर्स - हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जर्मनप्रीत सिंग, मनप्रीत सिंग, सुमित, संजय, मनदीप मोर, गुरिंदर सिंग
मिडफिल्डर - हार्दिक सिंग (उपकर्णधार), दिलप्रीत सिंग, मोइरंगथेम रविचंद्र सिंग, समशेर सिंग, आकाशदीप सिंग, विवेक सागर प्रसाद
फॉरवर्ड - अभिषेक, ललितकुमार उपाध्याय, एस कार्ती, गुरजंत सिंग, सुखजीत सिंग, राजकुमार पाल, मनदीप सिंग, सिमरनजीत सिंग
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.