Indian Women’s Hockey Team for Australia Tour 2023: भारतीय महिला हॉकी संघाला आगामी काही दिवसात ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. या दौऱ्यात 18 मे पासून तीन सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
ही मालिका ऍडलेडला होईल. तसेच भारतीय संघ ऑस्ट्रेलिया अ संघाशीही दोन सामने खेळणार आहे. त्यामुळे या दौऱ्यासाठी हॉकी इंडियाने 20 जणींच्या भारतीय हॉकी संघाची घोषणा केली आहे.
हा दौरा हँगझोऊ एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय संघाचे नेतृत्व गोलकिपर सविता करणार आहे. तिला डिफेंडर दीप ग्रेस एक्का हिची साथ मिळेल. दीप ग्रेस एक्काकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
तसेच संघात बिच्छू देवी खरीबम ही देखील गोलकिपिंगसाठी पर्याय आहे. डिफेंडर्समध्ये दीप ग्रेस एक्का व्यतिरिक्त निक्की प्रधान, इशिका चौधरी, उदीता आणि गुरजीत कौर यांचा समावेश आहे. मिडफिल्डर्सच्या फळीत निशा, नवज्योत कौर, मोनिका, सलिमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, ज्योती आणि बलजीत कौर यांचा समावेश आहे.
याशिवाय फॉरवर्ड्च्या फळीत 250 पेक्षा अधिक सामन्यांता अनुभव असणारी वंदना कटारीया आहे. तसेच लालरेमसियामी, संगीता कुमारी आणि शर्मिला देवी यांचा समावेश आहे.
याबद्दल बोलताना भारतीय महिला संघाची प्रशिक्षक जेनेके स्कॉपमनने सांगितले आहे की हा दौरा करण्यासाठी उत्सुक आहे. ही एक संघासाठी चांगली परिक्षा असेल.
भारताला 18, 20 आणि 21 मे असे तीन सामने ऑस्ट्रेलिया महिला हॉकी संघाविरुद्ध खेळयचे आहेत. याशिवाय 25 आणि 27 मे रोजी ऑस्ट्रेलिया अ संघाविरुद्ध सामने होतील. हे सर्व सामने ऍडलेडमधील मेट स्टेडियमवर होणार आहेत.
गोलकिपर - सविता (कर्णधार), बिच्छू देवी खरीबम
डिफेंडर्स - दीप ग्रेस एक्का (उपकर्णधार), निक्की प्रधान, इशिका चौधरी, उदीता, गुरजीत कौर
मिडफिल्डर्स - निशा, नवज्योत कौर, मोनिका, सलिमा टेटे, नेहा, नवनीत कौर, सोनिका, ज्योती, बलजीत कौर
फॉर्वर्ड्स - वंदना कटारीया, लालरेमसियामी, संगीता कुमारी, शर्मिला देवी
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.