Himachal

 

Dainik Gomantak 

क्रीडा

कुचबिहार करंडक स्पर्धेत हिमाचलचा गोव्यावर 'हल्लाबोल'

हिमाचलच्या (Himachal) फलंदाजांनी गोव्याच्या (Goa) असाह्य गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत दिवसभरातील 90 षटकांत 411 धावा नोंदविल्या.

किशोर पेटकर

पणजी : हिमाचलच्या (Himachal) फलंदाजांनी गोव्याच्या (Goa) असाह्य गोलंदाजांवर हल्लाबोल चढवत दिवसभरातील 90 षटकांत 411 धावा नोंदविल्या. त्यामुळे कुचबिहार करंडक 19 वर्षांखालील चार दिवसीय सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच त्यांनी लढतीवर घट्ट पकड बसविली. सूरत येथील खोलवड जिमखाना मैदानावर सुरू असलेल्या या सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर मंगळवारी हिमाचलने पहिल्या डावात 5 बाद 550 धावा केल्या. काल पहिल्या दिवसअखेर त्यांनी बिनबाद 139 धावा केल्या होत्या. गोव्याला पहिल्या डावात फक्त 153 धावा करता आल्या होत्या. हिमाचलचा संघ आता 397 धावांनी आघाडीवर आहे.

हिमाचलच्या तिघा फलंदाजांनी शतके ठोकली. सलामीवीर आशू शर्मा याने 103 धावा केल्या. त्याने अनिमेश ठाकूर (60) याच्यासमवेत 163 धावांची सलामी दिली. मध्यफळीतील मृदूल सुरोच 183 धावांवर नाबाद आहे. कर्णधार वैभव कालता यानेही शतक केले असून तो 140 धावांवर नाबाद आहे. गोव्याने तब्बल आठ गोलंदाज वापरले. मृदूल व वैभव यांनी सहाव्या विकेटसाठी 317 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव : 153

हिमाचल, पहिला डाव : (बिनबाद 139 वरून) 125 षटकांत 5 बाद 550 (आशू शर्मा 103, अनिमेश ठाकूर 60, मृदूल सुरोच नाबाद 183, वैभव कालता नाबाद 140, फरदीन खान 24-8-74-2, दीप कसवणकर 38-8-163-2, उदित यादव 19-1-65-1, लखमेश पावणे 21-2-74-0, मनीष काकोडे ११-१-५९-०, कौशल हट्टंगडी 6-1-15-0, आयुष वेर्लेकर 4-0-36-0, देवनकुमार चित्तेम 2-0-24-0).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Renuka Yellamma History: वीरशैव संप्रदायात धार्मिक उठाव झाला, सावदत्ती वैष्णव राजांच्या अधिपत्याखाली आली; यल्लम्माशी निगडित प्रथा

Betoda: बेतोड्यात आयआयटीला विरोध, सरपंचांना धरले धारेवर; ग्रामसभेत ठराव मंजूर

IND VS AUS: रोहित, विराट की आणखी कोणी? कॅप्टन शुभमन गिलनं सांगितलं पराभवाचं खरं कारण, म्हणाला...

Porascade Junction Accident: पोरस्कडे जंक्शनाकडेन भिरांकूळ अपघात

Crime News: त्रिकोणी प्रेमाचा रक्तरंजित शेवट: गर्भवती महिलेची चाकूने वार करून हत्या, खुनी आधीचा लिव्ह-इन पार्टनर, नंतर पतीने खुनीचा काढला काटा

SCROLL FOR NEXT