Hasan Ali  Dainik Gomantak
क्रीडा

BAN vs PAK 2nd Test: LIVE मॅचमध्ये दुर्घटना, हसन अली खेळपट्टीवर कोसळला अन् डोके आदळलं; स्ट्रेचरवरुन बाहेर नेलं, पाहा VIDEO

Hasan Ali Stretcher Video: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात एकाएकी शांतता पसरली, जेव्हा पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली एका मोठ्या अपघाताचा बळी ठरला.

Manish Jadhav

Hasan Ali Head Injury: बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यात सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान मैदानात एकाएकी शांतता पसरली, जेव्हा पाकिस्तानचा अनुभवी वेगवान गोलंदाज हसन अली एका मोठ्या अपघाताचा बळी ठरला. सिल्हट येथे खेळवल्या जाणाऱ्या या कसोटी सामन्यात स्वतःच्याच गोलंदाजीवर झेल टिपण्याचा प्रयत्न करताना हसन अली खेळपट्टीवर अतिशय वाईट रीतीने पडला आणि त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

त्याची अवस्था इतकी बिकट झाली होती की त्याला तातडीने स्ट्रेचरवरुन मैदानाच्या बाहेर न्यावे लागले. या संपूर्ण घटनेचा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ही धक्कादायक घटना सिल्हट कसोटीच्या पहिल्या दिवशी आठव्या षटकात घडली.

हसन अली सामन्यातील आठवे षटक टाकत होता. या षटकातील पाचव्या चेंडूवर बांगलादेशचा फलंदाज तंझिद हसन तमीम याने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू त्याच्या बॅटला लागून हवेत उडाला. गोलंदाज हसन अलीने आपल्या फॉलो-थ्रूमध्ये धावत जाऊन तो झेल पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला. परंतु, वेगावर नियंत्रण न राहिल्यामुळे त्याचा शारीरिक समतोल बिघडला आणि तो थेट खेळपट्टीवर जोरात कोसळला.

पडताना त्याचे डोके जमिनीवर खूप जोरात आदळले. पडल्यानंतर हसन काही सेकंदांसाठी मैदानात पूर्णपणे निपचित पडून होता, ज्यामुळे मैदानातील इतर खेळाडू, पंच आणि उपस्थित क्रिकेट चाहत्यांची चिंता कमालीची वाढली. त्यानंतर त्याने आपले डोके हाताने घट्ट पकडल्याचे दिसताच वैद्यकीय पथकाने मैदानात धाव घेतली.

पाकिस्तानी वेगवान गोलंदाजाला डोक्याला मार लागल्यामुळे चक्कर येत असल्याची तक्रार त्याने वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडे केली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय पथकाने त्याला अत्यंत काळजीपूर्वक स्ट्रेचरवर झोपवले आणि पुढील वैद्यकीय तपासणीसाठी तातडीने मैदाबाहेर नेले. यावेळी कॅमेऱ्यात पाकिस्तान संघाचे मुख्य प्रशिक्षक सरफराज अहमद आणि गोलंदाजी प्रशिक्षक उमर गुल यांच्या चेहऱ्यावर काळजीचे मोठे सावट स्पष्टपणे दिसत होते.

हसन अलीचे ते षटक अपूर्ण राहिल्यामुळे, त्याचे उरलेले चेंडू नंतर सलमान अली आगा याने टाकून ते षटक पूर्ण केले. हसन अली बराच वेळ मैदानाबाहेर उपचार घेत होता. मात्र, चाहत्यांसाठी दिलासादायक बाब म्हणजे, 19व्या षटकात हसन अली पुन्हा एकदा मैदानात परतला आणि त्याने गोलंदाजी करायला सुरुवात केली, ज्यामुळे पाकिस्तानी गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

जर सामन्याचा विचार केला, तर या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाकिस्तानचा (Pakistan) कर्णधार शान मसूद याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सिल्हटची खेळपट्टी सुरुवातीला वेगवान गोलंदाजांसाठी कमालीची फायदेशीर ठरत असल्याचे दिसत होते आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्याची प्रचितीही दिली. मोहम्मद अब्बासने सामन्याच्या अगदी दुसऱ्याच चेंडूवर बांगलादेशच्या महमूदुल हसन जॉय याला शून्य धावांवर बाद करुन पाकिस्तानला पहिले मोठे यश मिळवून दिले.

या सुरुवातीच्या धक्क्यानंतर तंझिद हसन तमीम आणि माजी कर्णधार मोमिनुल हक यांनी वेगाने धावा काढून पाकिस्तानच्या गोलंदाजांवर प्रतिआक्रमण करत दबाव कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, जम बसवू पाहणाऱ्या तंझिद हसन तमीम याला 26 धावांवर बाद करुन मोहम्मद अब्बासनेच बांगलादेशला (Bangladesh) दुसरा मोठा धक्का दिला आणि पाकिस्तानचे सामन्यावरील वर्चस्व कायम ठेवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

पावसाळ्यातील आरोग्य

Mrityu Panchak 2026: काळजाचा थरकाप उडवणारे 5 दिवस! मृत्यू पंचकाचा थरार; 5 राशींवर घोंगावणारं मोठं संकट

Goa Crime: स्क्रॅप यार्ड्सवर पोलिसांची धडक कारवाई! 172 जणांची कसून तपासणी

Team India T20 Captaincy: ‘अशाप्रकारे सूर्याला कर्णधारपदावरुन हटवणे चुकीचे’, बीसीसीआयच्या संभाव्य निर्णयावर पूर्व सिलेक्टर नाराज; काय म्हणाले नेमके?

Goa Sports: शालेय क्रिकेट स्पर्धेत 'जीसीए'ची दमछाक! राज्यस्तरीय अंतिम लढती प्रलंबित

SCROLL FOR NEXT