Stray Dog Management: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनात दिरंगाई; 8 पंचायत सचिवांवर कारवाई करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Stray Dog Compliance Reports in Goa: खंडपीठाने संबंधित सचिवांना आणखी एक संधी देत येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत पशुसंवर्धन विभागाकडे अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत वाढवून दिली आहे.
Stray Dog Compliance Reports in Goa
Stray Dog ManagementDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: भटक्या कुत्र्यांच्या व्यवस्थापनाबाबत वारंवार सूचना देऊनही अनुपालन अहवाल सादर न करणाऱ्या गोव्यातील आठ ग्रामपंचायतींच्या सचिवांवर सरकारी सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने पंचायत संचालकांना दिले आहेत.

मात्र, खंडपीठाने संबंधित सचिवांना आणखी एक संधी देत येत्या १६ नोव्हेंबरपर्यंत पशुसंवर्धन विभागाकडे अहवाल सादर करण्यासाठी एका आठवड्याची मुदत वाढवून दिली आहे.

Stray Dog Compliance Reports in Goa
Goa Agriculture: गोव्याचा पारंपरिक कृषी वारसा धोक्यात? नारळ प्रक्रिया आणि मीठ उत्पादनाला चालना देण्यासाठी सरकारकडे साकडे

२६ ऑक्टोबरच्या आदेशानुसार राज्यातील सर्व १०७ ग्रामपंचायतींना अहवाल देणे बंधनकारक होते. परंतु, यातील आठ पंचायतींनी अद्याप अहवाल सादर केला नसल्याचे समोर आले. अहवाल वेळेत न मिळाल्यामुळे राज्यभरात प्राणी निवारे उभारण्याचा कृती आराखडा तयार करण्यात पशुसंवर्धन विभागाला अडचणी येत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.