Harry Kane Dainik Gomantak
क्रीडा

Harry Kane: मँचेस्टर सिटीविरुद्धचा 'तो' गोल हॅरी केनसाठी विक्रमी, तब्बल 53 वर्षांचा मोडला रेकॉर्ड

Pranali Kodre

Harry Kane: प्रीमियर लीग स्पर्धेत 5 फेब्रुवारीला टॉटेनहॅम हॉटस्पर विरुद्ध मँचेस्टर सिटी क्लबमध्ये सामना झाला. या सामन्यात हॉटस्परने गतविजेत्यांविरुद्ध 1-0 अशा गोलफरकाने विजय मिळवला. हॉटस्परकडून कर्णधार कर्णधार हॅरी केनने महत्त्वपूर्ण आणि विक्रमी गोल नोदंवला.

या सामन्यात दोन्ही संघात कडवी लढत झाली. मात्र हॅरी केनने सामन्याच्या 15व्या मिनिटाला केलेला गोल महत्त्वपूर्ण ठरला. या सामन्यात हा एकमेव गोल नोंदवला गेला. दरम्यान, हा गोल हॅरी केनसाठी वैयक्तिकदृष्ट्या विक्रमी ठरला.

केनने हॉटस्परसाठी सर्व स्पर्धांमध्ये मिळून केलेला हा 267 वा गोल ठरला. त्यामुळे तो हॉटस्परकडून सर्वाधिक गोल करणारा फुटबॉलपटू ठरला आहे. 267 व्या गोलसह त्याने जिमी ग्रीव्हज यांचा 53 वर्षांचा विक्रम मोडला आहे. गेले 53 वर्षे ग्रीव्हज यांच्या नावावर हॉटस्परसाठी सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम होता. त्यांनी हॉटस्परसाठी 266 गोल केले होते.

प्रीमियर लीगमध्ये 200 गोल

याशिवाय मँचेस्टर सिटीविरुद्ध केलेला एकमेव गोल केनचा प्रीमियर लीगमधील २०० वा गोलही ठरला. त्यामुळे तो प्रीमियर लीगमध्ये 200 किंवा त्यापेक्षा अधिक गोल करणारा केवळ तिसराच फुटबॉलपटू बनला आहे.

प्रीमियर लीगमध्ये सर्वाधिक गोल करण्याचा विक्रम न्यूकॅसलचा दिग्गज खेळाडू ऍलेन शिरेरच्या नावावर आहे. शिरेरने 260 गोल प्रीमियर लीगमध्ये नोंदवले आहेत. त्यापाठोपाठ २०८ गोलसह वेन रुनी आहे. आता या दोघांसह प्रीमियर लीगमध्ये 200 गोल करण्याच्या यादीत केनचाही समावेश झाला आहे.

केनच्या या विक्रमाबद्दल शिरेरने ट्वीट करत त्याचे अभिनंदन देखील केले आहे. त्यांनी त्याचे प्रीमियर लीगमधील 200 गोलच्या क्लबमध्ये स्वागत असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे.

केनने त्याच्या विक्रमाबद्दल आनंद व्यक्त केला आहे. स्काय स्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, 'शब्दात सांगणे कठीण आहे. हा जादुई क्षण आहे. मला आनंद आहे आम्ही जिंकलो. चाहत्यांसमोर हे करणे विशेष आहे.'

'याबद्दल गेल्या दोन आवड्यांपासून चर्चा होत होती आणि हा गोल मोठ्या सामन्यात आल्याने तो अधिक खास ठरला. जेव्हा मी नियमितपणे खेळायला सुरुवात केली होती, तेव्हा मला वाटले नव्हते की मी प्रीमियर लीगमध्ये 200 गोल करेल. माझ्या कारकिर्दीची आणखी काही वर्षे शिल्लक आहेत, त्यामुळे आशा आहे की आणखी गोल होतील.'

याशिवाय ग्रीव्हज यांचा विक्रम मोडल्याबद्दलही केन म्हणाला की हा त्याच्यासाठी खूप मोठा क्षण होता.

आता हॉटस्परचा पुढील सामना 11 फेब्रुवारीला लिसेस्टर सिटीविरुद्ध होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT