Turkey Earthquake: हाजारो मरण पावले पण घानाचा फुटबॉलपटू भूकंपाच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडला

भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या हाताय प्रांतात तो थांबला होता.
Christian Atsu
Christian Atsu Dainik Gomantak
Published on
Updated on

तुर्की आणि सीरियामध्ये सोमवारी आलेल्या तीन मोठ्या भूकंपानंतर दोन्ही देशांतील अनेक शहरे उद्ध्वस्त झाली. त्यानंतर मंगळवारीदेखील पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपात एकूण 4,300 जणांचा मृत्यू झाला असून, 15 हजार जखमी झाले आहेत. अद्याप देखील ढिगाऱ्याखालून मृतदेह काढण्याचे प्रकार सुरूच आहेत.

दरम्यान, घानाचा फुटबॉलपटू आणि न्यूकॅसलचा माजी मिडफिल्डर ख्रिश्चन अत्सू हा भूकंपाच्या ढिगाऱ्यात जिवंत सापडला आहे. ख्रिश्चन अत्सू (Christian Atsu), 31, सप्टेंबरमध्ये तुर्कीच्या सुपर लिगमध्ये सामील झाला होता. त्यानंतर तो भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या हाताय प्रांतात तो थांबला होता.

Christian Atsu
Turkey Earthquake: तुर्कीत पुन्हा 5.5 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; मृतांचा आकडा 4300 वर...

Hatayspor अधिकारी मुस्तफा ओझट यांनी एका चॅनेलला दिलेल्या माहितीनुसार, "मला घाना असोसिएशनच्या अध्यक्षांकडून नुकतीच एक माहिती मिळाली आहे. फुटबॉलपटू ख्रिश्चन अत्सू हातेमध्ये सापडला आहे."

दरम्यान, भूकंपामुळे 10 प्रांतातील जवळपास 3,500 इमारती कोसळल्या आहेत. 11,000 हून अधिक लोक जखमी झाले आणि ढिगार्‍याखाली अनेक लोक अडकले आहेत. बचाव पथकं सध्या सात मजली इमारतीतून वाचलेल्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

या भीषण दुर्घटनेत मदत करण्यासाठी भारताने एनडीआरएफच्या दोन पथकांसह मदत सामग्री पाठवली आहे. मंगळवारी सकाळी भारतीय हवाई दलाच्या C-17 विमानाने या पथकांना रवाना केले. या टीममध्ये स्निफर डॉगचाही समावेश आहे.

Christian Atsu
Turkey Earthquake: भारताने दिला तुर्कीला मदतीचा हात , NDRF पथकांकडून बचावकार्यात मदत

तुर्कस्तानचे उपाध्यक्ष फुआत ओकटे यांनी सांगितले की, ढिगाऱ्यातून 7,840 लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. रात्री बचाव कार्यासाठी 11,022 लोकांना तैनात करण्यात आले आहे. 3 लाख 38 हजार भूकंपग्रस्तांना वसतिगृहे, विद्यापीठे आणि आश्रयस्थानांमध्ये ठेवण्यात आले आहे.

दरम्यान, सीरियाचे उप-आरोग्य मंत्री अहमद दामिरिया यांनी सांगितले की भूकंपामुळे प्रभावित झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी अलेप्पो आणि लताकिया येथे 28 रुग्णवाहिका आणि सात मोबाइल क्लिनिक पाठवण्यात आले आहेत. याशिवाय अलेप्पो, लताकिया आणि हमा येथे औषधे, शस्त्रक्रिया आणि आपत्कालीन सामग्रीचे चार ट्रक पाठवण्यात आले आहेत. सीरियाने यूएन सदस्य देश, संस्था, एजन्सी आणि रेड क्रॉसच्या आंतरराष्ट्रीय समितीकडे मदत मागितली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com