Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर हार्दिक पंड्याची IPL मध्ये धूमशान एंट्री

हार्दिकने चार षटकात एकही विकेट न घेता 37 धावा दिल्या.

दैनिक गोमन्तक

Hardik Pandya Latest News : अष्टपैलू हार्दिक पांड्याने जवळपास दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आयपीएलमध्ये गोलंदाजी केली आहे. यापूर्वी हार्दिकने आयपीएल 2019 च्या अंतिम सामन्यात गोलंदाजी केली होती. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या ओपनिंग स्पेलनंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक गोलंदाजीसाठी आला. हार्दिकने (Hardik Pandya) चार षटकात एकही विकेट न घेता 37 धावा दिल्या.

चौथ्या क्रमांकावर उतरलेल्या हार्दिकने 28 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 33 धावा केल्या. आपल्या शानदार फलंदाजीदरम्यान हार्दिकने मॅथ्यू वेडसोबत तिसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला. वेडने 29 चेंडूंत 30 धावा केल्या, ज्यात चार चौकारांचा समावेश होता.

टीम इंडियातून बाहेर पडत असलेल्या हार्दिकने गेल्या वर्षी जुलैमध्ये भारताच्या श्रीलंका दौऱ्यात एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय अशा एकूण 16 षटके टाकली होती. हार्दिकने आयपीएल 2020 आणि 2021 च्या हंगामात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) साठी अजिबात गोलंदाजी केली नाही आणि तो फलंदाज म्हणून खेळला. शेवटच्या वेळी हार्दिकने अफगाणिस्तानविरुद्ध T20 विश्वचषक 2020 मध्ये भारतासाठी गोलंदाजी केली, जिथे त्याने 2 षटकात 23 धावा दिल्या.

2018 आशिया चषक दरम्यान पाठीच्या दुखापतीशी झुंज दिल्यानंतर हार्दिकने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये कमी गोलंदाजी केली आहे. आयपीएलच्या शेवटच्या सत्रात हार्दिक पांड्याने एकही षटक टाकला नाही. T20 विश्वचषकादरम्यान हार्दिक पांड्याच्या फिटनेसवर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. या महिन्याच्या सुरुवातीला बीसीसीआयच्या (BCCI) सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये हार्दिकची ग्रेड-ए वरून ग्रेड-सीमध्ये रूपांतर करण्यात आली होती.

हार्दिक पांड्याने 11 कसोटी, 63 एकदिवसीय आणि 54 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. हार्दिक पांड्याने कसोटी सामन्यांमध्ये 532 धावा केल्या आहेत, तर एकदिवसीय आणि T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याच्या नावावर अनुक्रमे 1286 आणि 553 धावा आहेत. IPL कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, 93 सामन्यात 1509 धावा करण्यासोबतच हार्दिक पांड्याने 42 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ireland Head Coach Resign: भारतविरुद्धच्या शानदार विजयानंतर आयर्लंडच्या मुख्य प्रशिक्षकांचा तडकाफडकी राजीनामा; गॅरी विल्सनकडे सोपवली जबाबदारी

Yuti Yog 2026: जुलै महिन्यात ग्रहांचा महाविनाशकारी खेळ! तीन वेळा बनणार 'अशुभ युती योग'; 5 राशींसाठी ठरणार काळ

'8th Pay Commission' ची प्रतीक्षा! सरकारी कर्मचाऱ्यांच्या 'त्या' 5 मागण्यांवर होणार शिक्कामोर्तब? जुलै महिन्यातील बैठकीकडे लक्ष

National Sub Junior Boxing Championship: गोव्याच्या कनिष्काला बॉक्सिंगमध्ये ब्राँझ, राष्ट्रीय सबज्युनियर स्पर्धेत मुलींच्या गटात चमकदार कामगिरी

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

SCROLL FOR NEXT