Hardik Pandya X/ICC
क्रीडा

World Cup 2023: हार्दिक स्पर्धेतून बाहेर! सेमीफायनलमध्ये पोहचलेल्या टीम इंडियात 'या' बॉलरची वर्णी

Hardik Pandya: हार्दिक पंड्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे, त्याच्याऐवजी बदली खेळाडूचीही घोषणा करण्यात आली आहे.

Pranali Kodre

Hardik Pandya will miss remainder of ICC ODI Cricket World Cup 2023:

भारतीय क्रिकेट संघाने वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शानदार कामगिरी केली आहे. भारताने सलग 7 सामने जिंकून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पण अशातच भारताला मोठा धक्का बसला आहे. भारताचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू आणि उपकर्णधार हार्दिक पंड्या उर्वरित वर्ल्डकप 2023 स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

बीसीसीआयच्या निवड समितीने त्याच्या जागेवर वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाची बदली खेळाडू म्हणून निवड करण्यात आली आहे. यासाठी आयसीसीच्या वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठीच्या तांत्रिक समितीने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता प्रसिद्ध कृष्णा रविवारी होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.

हार्दिककडे या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, त्याला 19 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात पुण्याला झालेल्या सामन्यावेळी डाव्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती.

या सामन्यात त्याच्याच गोलंदाजीवेळी क्षेत्ररक्षण करताना जखमी झाला. त्यानंतर लगेचच त्याच्यावर उपचार करण्यात आलेले, तसेच स्कॅन करण्यात आले. त्यानंतर त्याला बंगळुरूला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले. दरम्यान, तो अद्याप या दुखापतीतून सावरलेला नाही. त्यामुळे आता त्याला या स्पर्धेतून बाहेर व्हावे लागले आहे.

हार्दिकने या स्पर्धेत खेळलेल्या चार सामन्यात 5 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच त्याला चार सामन्यात केवळ एकदाच फलंदाजीची संधी मिळाली आहे, ज्यात त्याने नाबाद 11 धावा केल्या होत्या.

प्रसिद्ध कृष्णाची कामगिरी

दरम्यान, हार्दिकच्या जागेवर भारतीय संघात वर्णी लागलेल्या प्रसिद्ध कृष्णाने आत्तापर्यंत 17 वनडे आणि 2 टी20 सामने खेळले आहेत. कृष्णाने वनडेत 29 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच टी20 क्रिकेटमध्ये 4 विकेट्स घेतल्या आहेत.

भारतीय संघ उपांत्य सामन्यात

भारतीय संघाने उपांत्य फेरीत स्थान मिळवले असले, तरी त्यांना अद्याप दक्षिण आफ्रिका आणि नेदरलँड्स विरुद्ध साखळी फेरीतील सामने खेळायचे आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी सामना होणार आहे, तर नेदरलँड्सविरुद्ध 12 नोव्हेंबर रोजी सामना होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT