Hardik Pandya uses abusive language Dainik Gomantak
क्रीडा

India vs Sri Lanka: हार्दिकने गमावला संयम, टीममेट्सविरुद्धच वापरले अपशब्द; Video व्हायरल

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेदरम्यान हार्दिक पंड्या अपशब्द वापरतानाची घटना स्टंप माईकमध्ये कैद झाली.

Pranali Kodre

India vs Sri Lanka, 2nd ODI: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी ईडन गार्डन्सवर होत आहे. प्रथमदर्शनी पहिल्या डावात भारतीय गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले आहे. पण याच सामन्यादरम्यान भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पंड्याचे नियंत्रण सुटताना दिसले, त्याने भारतीय संघातील संघसहकाऱ्यालाच अपशब्द वापरले.

या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतीय संघ प्रथम क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरला. दरम्यान, 11 वे षटक संपल्यानंतर हार्दिक मैदानात आलेल्या एका राखीव खेळाडूवर चिडताना दिसला. त्याची वाक्य स्टंप माईकमध्ये कैद झाली.

हार्दिक राखीव खेळाडूला म्हणाला की मागच्या षटकात पाणी मागितले होते, पण त्यांनी काही आणले नाही. हे बोलताना त्याने अपशब्दही वापरले. या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, त्याच्यावर आपल्याच संघसहकाऱ्यावर अशाप्रकारे चिडल्याबद्दल टीकाही होत आहे.

(Hardik Pandya uses abusive language during India vs Sri lanka 2nd ODI)

दुसऱ्या सामन्यासाठी दोन्ही संघात बदल

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी दुसऱ्या वनडे सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केले आहेत. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये युजवेंद्र चहल ऐवजी कुलदीप यादवला संधी दिली आहे. यामागे चहल पहिल्या वनडेत झालेल्या छोट्या दुखापतीतून सावरला नसल्याचे कारण रोहित शर्माने स्पष्ट केले आहे.

तसेच श्रीलंकेने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. त्यांनी दुसऱ्या सामन्यासाठी दिलशान मदुशंका आणि पाथम निसंका यांना संघातून बाहेर केले असून नुवानिदू फर्नांडो आणि लहिरू कुमारा यांना संधी दिली आहे. फर्नांडोचा हा पहिलाच वनडे सामना आहे.

कुलदीपची चांगली गोलंदाजी

चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने मिळालेल्या संधीचा फायदा करून घेतला आहे. त्याने डावाच्या 17व्या षटकात कुशल मेंडिसला पायचीत करत या सामन्यातील त्याची पहिली विकेट घेतली.

त्यानंतर त्याने चरिथ असलंका आणि श्रीलंकेचा कर्णधार दसून शनका यांना बाद करत भारताच्या मार्गातील मोठे अडथळे दूर केले. त्याने त्याच्या 10 षटकांमध्ये 5.10 च्या इकॉनॉमी रेटने 3 विकेट्स घेतल्या.

श्रीलंका संघाची फलंदाजी ढेपाळली

दरम्यान, श्रीलंकेचा संघ 39.4 षटकातच 215 धावांवर सर्वबाद झाला. श्रीलंकेकडून पदार्पणवीर फर्नांडो याने 50 धावांची खेळी केली. त्याच्याव्यतिरिक्त कुशल मेंडिस (34) आणि दुनिथ वालालागे (32) यांनी 30 धावांचा टप्पा ओलांडला. अन्य फलंदाजांना खास कामगिरी करता आली नाही.

भारताकडून कुलदीपशिवाय मोहम्मद सिराजने 3 विकेट्स घेतल्या. तसेच उमरान मलिकने 2 आणि अक्षर पटेलने 1 विकेट घेतली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Session: शिक्षकांच्या शैक्षणिक पात्रतेची पडताळणी होणार, अपात्र शिक्षकांना घरी पाठवणार; मुख्यमंत्र्यांची तंबी

Ganesh Festival 2025: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना रेल्वेकडून मोठी भेट; 6 अतिरिक्त विशेष गाड्यांची केली घोषणा!

Sunburn Festival 2025: बरं झालं! सनबर्न गोव्याबाहेर गेल्यावर मंत्री नाईकांची प्रतिक्रिया; म्हणाले, आपली संस्कृती-परंपरा सुरक्षित राहील

Ravichandran Ashwin: 'तुम्ही जे पेराल ते उगवेल'! स्टोक्सच्या 'मस्करी'ला अश्विनचे सडेतोड उत्तर; जाणून घ्या नेमके प्रकरण?

Numerology: जन्मतारखेत दडलेय 'कर्माचे फळ'; या तारखांना जन्मलेल्यांना संघर्ष आणि यशासाठी वाट का पहावी लागते?

SCROLL FOR NEXT