Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya Comeback: टीम इंडियासाठी आनंदाची बातमी! अफगाणिस्तानविरुद्ध हार्दिक पांड्याचं होणार कमबॅक; चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण

Hardik Pandya International Cricket Comeback 2026: आयसीसी टी-20 वर्ल्ड कपनंतर पांड्या आता पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये मैदानात जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला असून तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

Manish Jadhav

Hardik Pandya International Cricket Comeback 2026: टीम इंडियाचा सुपरस्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या गेल्या काही दिवसांपासून दुखापतीमुळे क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. गेल्या काही महिन्यांत फक्त आयपीएल ट्रेडच्या चर्चांमध्येच त्याचे नाव सातत्याने समोर येत होते. मात्र, आता हार्दिकच्या चाहत्यांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली. आयसीसी टी-20 वर्ल्ड कपनंतर पांड्या आता पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीमध्ये मैदानात जलवा दाखवण्यासाठी सज्ज झाला असून तो लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे.

'टाइम्स ऑफ इंडिया'च्या ताज्या अहवालानुसार, पांड्या आगामी अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील ही महत्त्वपूर्ण टी-20 मालिका 13 सप्टेंबर 2026 पासून सुरु होणार असून, या मालिकेतील सर्व सामने दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत.

अफगाणिस्तानविरुद्धच्या या मालिकेत दमदार कामगिरी करुन पांड्या एशियन गेम्स 2026च्या संघातही स्वतःचा दावा मजबूत करण्याचा प्रयत्न करेल. सध्या एशियन गेम्सच्या प्राथमिक संघात त्याला स्थान मिळालेले नाही, परंतु काही खेळाडूंच्या दुखापतींमुळे आगामी काळात त्या संघात मोठे बदल होऊ शकतात, ज्याचा फायदा हार्दिकला मिळू शकतो. आयपीएल 2026 मधील हार्दिकची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नव्हती, त्यामुळे या पुनरागमनाच्या मालिकेत बॅट आणि बॉल दोन्हीने चमकदार कामगिरी करुन टीकाकारांना चोख उत्तर देण्याचा त्याचा मानस असेल.

हार्दिक पांड्या (Hardik Pandya) हा टीम इंडियासाठी नेहमीच एक मोठा मॅच विनर खेळाडू राहिला आहे, यामुळेच संघ व्यवस्थापन आणि निवड समिती त्याच्या फिटनेसबाबत नेहमीच चिंतेत असते. सध्या फिटनेससोबतच हार्दिकचा फॉर्म हा देखील टीम इंडियासाठी चिंतेचा विषय बनला आहे. आगामी आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2027च्या दृष्टीने हार्दिक पांड्या हा भारताचा अत्यंत महत्त्वाचा कणा मानला जात आहे. अशा परिस्थितीत हार्दिकचे संघात परतणे आणि त्याने लवकरात लवकर फॉर्मात येणे संघाच्या संतुलनासाठी अत्यंत गरजेचे आहे. या कमबॅक मालिकेत त्याच्या कामगिरीवर संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागून राहणार आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kumar Kushagra Century: भारतीय फलंदाजीचा नवा हुकमी एक्का! 21 वर्षाच्या पोरानं ठोकलं शानदार शतक, कांगारुंची काढली पिसं; सिलेक्टर्सचं वेधलं लक्ष

श्रीलंकन कोर्टाचा मोठा निकाल! ईस्टर साखळी बॉम्बस्फोटातील 15 दोषींना सुनावली प्रत्येकी 220 वर्षांची शिक्षा; 11 भारतीयांसह 270 बळींना न्याय

Ranji Trophy: गोव्याचा स्वप्नील अस्नोडकर आता केरळचा मुख्य प्रशिक्षक! रणजीसह वनडे-टी-20 संघाचीही जबाबदारी; 2026-27मोसमासाठी मोठी संधी

Vagator Turtle Protection: वागातोर किनाऱ्यावर कासवांची 24 तास निगराणी! ऑलिव्ह रिडलेच्या अंड्यांच्या संरक्षणासाठी वन विभागाची कडक गस्त

Goa Building Rule: गोव्यात अवघ्या 3 मीटर रस्त्यावर बांधकामांना परवानगी? 2023च्या सुधारित नियमांना न्यायालयात आव्हान; सरकारला नोटीस

SCROLL FOR NEXT