Hardik Pandya  Dainik Gomantak
क्रीडा

Hardik Pandya In MI: गुजरातचा हार्दिकला इमोशनल अलविदा! आता गिल सांभाळणार नेतृत्वाची कमान

Hardik Pandya In MI: हार्दिक पंड्या आता मुंबई इंडियन्समध्ये पुन्हा परतला असून गुजरातची कॅप्टन्सी शुभमन गीलकडे देण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.

दैनिक गोमन्तक

Hardik Pandya In MI: वर्ल्डकप २०२३ संपल्यावर आता लगेच क्रिकेटच्या चाहत्यांना आयपीएलचे वेध लागले आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2024 हंगामाचा लिलाव होण्यापूर्वी 26 नोव्हेंबर सर्व फ्रँचायझींना संघात कायम केलेल्या खेळाडूंची आणि मुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर करण्याची अखेरची तारीख होती. गुजरात टायटन्स संघानेही खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. पण यानंतर पुन्हा उलटफेर केले आहेत.

गेल्या काही दिवसांपासून हार्दिक गुजरात टायटन्समध्येच राहणार का पुन्हा मुंबईत परतणार याची चर्चा रंगताना दिसत होती. आता हार्दिकची मुंबई इंडियन्समध्ये घरवापसी झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. हार्दिक पंड्या आता पुन्हा परतला असून गुजरातची कॅप्टन्सी शुभमन गीलकडे देण्यात आल्याची माहीती समोर आली आहे.

भारताचा प्रतिभाशाली फलंदाज शुभमन गिल हा देखील गुजरातचे नेतृत्व करण्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याच्याकडे भारताचा भविष्यातील कर्णधार म्हणूनही पाहिले जातात. त्यामुळे भविष्याचा विचार करता दीर्घकाळासाठी गिलकडे कर्णधार म्हणून पाहिजे जाऊ शकते.

शुभमनने गिल 2018 पासून आयपीएलमध्ये खेळत आहे. त्याने आत्तापर्यंत 91 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 3 शतके आणि 18 अर्धशतकांसह 2790 धावा केल्या आहेत. त्याने ही तीनही शतके 2023 आयपीएल हंगामात केली आहेत.

यादरम्यान, हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सची दोन वर्षे कर्णधारपद सांभाळत एकदा विजेतेपद आपल्या नावावर केले होते. तर दुसऱ्यांदा टीम आयपीएलच्या फायनल्समध्ये पोहचली होती. आता हार्दिक टीममधून बाहेर पडत असताना गुजरात टायटन्सकडून भावूक करणारे ट्वीट केले आहे. हार्दिकच्या टीमसाठी योगदानासाठी गुजरात टायटन्सकडून आभार मानत त्याच्या भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

आता गिल ही नवीन जबाबदारी कशी सांभाळणार आणि हार्दिक पंड्या आयपीएलमध्ये कसा परर्फॉम करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asrani Death: हम अंग्रेजों के जमाने के जेलर हैं! प्रसिद्ध डायलॉग मागील आवाज कायमचा शांत झाला; अभिनेते असरानींचे निधन

स्वप्नपूर्ती! फक्त 60 रूपयांत स्टेडियममधून पाहा टीम इंडियाचा कसोटी सामना, ऑफर कधी आणि कशी मिळेल? जाणून घ्या

Ponda Accident: कारने धडक दिल्याने एका 8 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Viral Post: "विश्वचषक जिंकायचा असेल तर अजित आगरकर, गौतम गंभीरला हटवा", व्हायरल पोस्टवर नवज्योत सिंग सिद्धू संतापले

Horoscope: लक्ष्मीपूजन होणार फलदायी! दिवाळीच्या काळात 'या' 5 राशींना मिळणार यश आणि संपत्ती, वाचा सविस्तर दैनिक राशी भविष्य

SCROLL FOR NEXT