Hardik Pandya 
क्रीडा

IND vs PAK: 'श्रृंग ब्रिंग सरवलिंग...', विकेट घेण्याआधी हार्दिकने असं काही केलं की सोशल मीडियावर चर्चेला उधाण

Hardik Pandya: हार्दिकने इमाम-उल-हकला बाद करण्याआधी केलेल्या कृतीने सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे.

Pranali Kodre

ICC ODI Cricket World Cup 2023, India vs Pakistan, Hardik Pandya:

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत शनिवारी भारत विरुद्ध पाकिस्तान संघात सामना होत आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना होत आहे. या सामन्यात पाकिस्तान 191 धावांवर सर्वबाद झाले.

दरम्यान, हार्दिक पंड्याने घेतलेल्या इमाम-उल-हकच्या विकेटची चांगलीच चर्चा रंगली. त्याच्या या विकेटनंतर सोशल मीडियावर अनेक गमतीशीर प्रतिक्रियाही उमटल्या आहेत.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पाकिस्तानकडून अब्दुल्ला शफिक आणि इमाम-उल-हक यांनी डावाची सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानला चांगली सुरुवात करून दिली होती. पण 8 व्या षटकात मोहम्मद सिराजने शफिकला २० धावांवर बाद करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला.

त्यानंतर इमामने कर्णधार बाबर आझमला साथीला घेत पाकिस्तानला डाव पुढे नेला होता. मात्र, 13 व्या षटकात हार्दिक पंड्या गोलंदाजीला आला.

13 व्या षटकात पहिल्या चेंडूवर बाबरने एक धाव घेतली. यानंतर दुसऱ्या चेंडूवर इमामने चौकार मारला. पण यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला.

हार्दिकने ऑफ स्टंपच्या बाहेर टाकलेल्या चेंडूवर इमाम फटका मारायला गेला. पण चेंडू त्याच्या बॅटची कड घेत मागे यष्टीरक्षण करत असलेल्या केएल राहुलकडे गेला. केएल राहुलनेही डाईव्ह मारत शानदार झेल घेतला. त्यामुळे इमामला 36 धावांवर बाद व्हावे लागले.

दरम्यान, ही विकेट घेण्याआधी म्हणजेच तिसरा चेंडू टाकण्यापूर्वी हार्दिक चेंडू हातात घेऊन तो तोंडाजवळ नेऊन काहीतरी पुटपुटल्याचे दिसले. त्याचा हा फोटो बराच व्हायरल झाला. अनेक युजर्सने त्याची मजा घेताना भन्नाट कमेंट्स केल्या.

पंजाब किंग्स या आयपीएल संघानेही सोशल मीडियावर त्याचा फोटो शेअर करत गमतीशीर कॅप्शन दिले. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की 'श्रृंग ब्रिंग सर्वलिंग भूत भविष्य वर्तमान बदलिंग'.

दरम्यान काही युजर्सने त्याने चेंडूला लाळ लावली का, असा प्रश्नही उपस्थित केला. जवळपास गेल्या 3 वर्षांपासून चेंडूला लाळ लावण्यासाठी बंदी आहे. तथापि, हार्दिकने नक्की 13 व्या षटकातील तिसरा चेंडू फेकण्याआधी काय केले होते, याबद्दल अधिकृत माहिती मिळाली नाही.

दरम्यान, या सामन्यात पाकिस्तान संघ 42.5 षटकांमध्ये 191 धावांत सर्वबाद झाला. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आझमने सर्वाधिक 50 धावांची खेळी केली. तसेच मोहम्मद रिझवानने 49 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

जाहिराती थांबवल्या, कार्यक्रमही रद्द! गोवा पोलिसांच्या निर्देशानंतर 'टेल्स ऑफ कामसूत्रा'वर पडदा; आयोजकांनी व्यक्त केली दिलगिरी

Delhi Red Fort Blast: 2023 पासून दिल्ली 'टार्गेट'वर! बॉम्बस्फोटाची तयारी 2 वर्षांपासून सुरू होती; धक्कादायक खुलासा समोर

"अहवालानंतरच बोलेन!", पूजा नाईकच्या आरोपांवर वीजमंत्री ढवळीकरांची प्रतिक्रिया; Watch Video

Bicholim News:डिचोली शहराची सुरक्षा बेभरवशाची; 1 कोटी रुपये खर्चून बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे 'शोभेची वस्तू'!

Bike Stunt Viral Video: यांना कायद्याची भीती नाही? गोव्यात तरूणांची हुल्लडबाजी; चालत्या दुचाकीवर उभं राहून धोकादायक स्टंट, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT