Kane Williamson: विलियम्सनवर पुन्हा वर्ल्डकपमधून बाहेर होण्याचे संकट, पण दुखऱ्या गुडघ्यामुळे नाही, तर...

World Cup 2023: वर्ल्डकप 2023 स्पर्धेची शानदार सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंड क्रिकेट संघाला नुकताच मोठा धक्का बसला आहे.
Kane Williamson
Kane WilliamsonX/ICC
Published on
Updated on

ICC ODI Cricket World Cup 2023, New Zealand captain Kane Williamson Injury :

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धा हळुहळू रंगू लागली आहे. या स्पर्धेत न्यूझीलंड क्रिकेट संघाने शानदार सुरुवात केली आहे. त्यांनी पहिले तिन्ही सामने जिंकले आहेत. पण त्यांना तिसऱ्या सामन्यानंतर मोठा धक्का बसला आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन या महिन्यात होणाऱ्या सर्व सामन्यांमधून बाहेर झाला आहे.

खरंतर विलियम्सनला आयपीएल 2023 मध्ये गुडघ्याची दुखापत झाली होती, त्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. पण यातून सावरून त्याने न्यूझीलंडकडून वर्ल्डकप २०२३ मध्ये पुनरागमन केले होते.

दरम्यान, तो याच दुखापतीमुळे न्यूझीलंडकडून पहिल्या दोन सामन्यात खबरदारी म्हणून खेळला नव्हता. मात्र, बांगलादेशविरुद्ध 13 ऑक्टोबरला झालेल्या सामन्यात त्याने पुनरागमन केले. मात्र, याच सामन्यात तो पुन्हा दुखापतग्रस्त झाला. या सामन्यात खेळताना त्याच्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. त्याचमुळे आता त्याला पुन्हा एकदा क्रिकेटपासून दूर व्हावे लागणार आहे.

Kane Williamson
IND vs PAK सामन्यापूर्वी सूर्यकुमारची पोस्ट व्हायरल; म्हणतोय 'भाईलोग सगळ्यांच्या घरी टीव्ही आहेत...'

बांगलादेशविरुद्ध चेन्नईमध्ये खेळताना एकेरी धाव काढण्याच्या नादात त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला 78 धावांवर रिटायर्ड हर्ट व्हावे लागले होते.

दरम्यान, सामन्यानंतर करण्यात आलेल्या स्कॅनमधून त्याचा डाव्या हाताचा अंगठा फ्रॅक्चर झाल्याचे निदान करण्यात आले आहे.

याच कारणामुळे तो किमान या महिन्यात तरी क्रिकेट खेळू शकणार नाही, मात्र तो पुढील महिन्यात वर्ल्डकपच्या अखेरच्या टप्प्यात पुनरागमन करू शकतो. याबद्दल न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने माहिती दिली आहे.

तसेच खबरदारी म्हणून न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टॉम ब्लंडेलला भारतात विलियम्सनला कव्हर म्हणून बोलावून घेतले आहे. दरम्यान, न्यूझीलंडचे प्रशिक्षक गॅरी स्टेड यांना आशा आहे की अद्यापही 33 वर्षीय विलियम्सन संघात महत्त्वाचे योगदान देऊ शकतो.

Kane Williamson
IND vs PAK: क्रिकेटचा फिव्हर बॉलीवूडवरदेखील; भारत- पाकिस्तानच्या सामन्यासाठी 'या' कलाकारांनी लावली हजेरी

गॅरी स्टेड यांनी सांगितले, 'पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला सर्वांनाच केनबद्दल वाईट वाटले. त्याने त्याच्या गुडघ्याच्या दुखापतीनंतर मेहनत घेऊन पुनरागमन केले होते. ही निराशाजनक बादतमी आहे. पण सुरुवातीलाच हे निदान झाल्याने आम्हाला आशा आहे की तो काही काळ विश्रांती आणि रिबिहॅबिलिटेशननंतर पुढच्या टप्प्यात खेळू शकतो.'

स्टेड पुढे म्हणाले, 'केन आमच्या संघातील महत्त्वाचा भाग आहे आणि जागतिक दर्जाचा खेळाडू आहे आणि कर्णधारही आहे. त्यामुळे आम्ही त्याला या स्पर्धेत पुनरागमनासाठी प्रत्येत संधी देण्याचा प्रयत्न करू.'

त्याचबरोबर स्टेड यांना टॉम ब्लंडेलबाबातही सकारात्मक प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की त्याने पाकिस्तान आणि बांगलादेश दौऱ्यात चांगली कामगिरी केली आहे. तसेच जर त्याची गरज पडली, तर तो यष्टीरश्रक फलंदाज म्हणून विविध पर्याय खुले करून देऊ शकतो.

न्यूझीलंडचा पुढील सामना अफगाणिस्तानविरुद्ध बुधवारी चेन्नईमध्येच रंगणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com