Harbhajan Singh  dainik gomantak
क्रीडा

क्रिकेटमधून निवृत्तीनंतर हरभजन सिंग उतरणार राजकारणात !

हरभजन सिंगने मात्र, याबाबत आपण काहीही ठरवले नसल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमन्तक

अनुभवी फिरकीपटू (स्पिनर) हरभजन सिंगने नुकतीच क्रिकेट मधुन निवृत्ती जाहीर केली. भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू हरभजन सिंगने काय करायचे हे अजून ठरवलेले नसले तरी अलीकडेच मात्र हरभजन सिंगने माजी भारतीय क्रिकेटपटू आणि पंजाब काँग्रेसचे ( Punjab Congress) प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू यांची भेट घेतली. तेव्हापासून सट्ट्याचा बाजार चांगलाच गरम आहे. तो राजकारणात येऊ शकतो, असा अंदाज लोक व्यक्त करत असले तरी, हरभजन सिंगने मात्र, याबाबत आपण काहीही ठरवले नसल्याचे त्यांनी सांगितले. आणि खेळाशीच जुडून रहायचे आहे असेही सांगितले.(BCCI)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना हरभजन (harbhajan sing) म्हणाला की, 'मला पुढे काय करायचे आहे या संद्रभातला विचार करायचा आहे. मात्र मी जो काही आहे तो खेळामुळे आहे. मला खेळ चालू ठेवायला आवडेल आणि मला कायम खेळासोबत राहायचे आहे. खेळाशी जोडलेले राहण्यासाठी मी काही ना काही नक्कीच करत राहणार, आयपीएलच्या (IPL) कोणत्याही संघाचा मार्गदर्शक बनू शकतो, कॉमेंट्री करू शकतो किंवा खेळाशी जोडलेले राहण्यासाठी काहीतरी नवीन करत राहणार, पण यावेळी मात्र मी राजकारणात प्रवेश करणार का? किंवा नाही? यासंदर्भात मला माहीत नाही.

हरभजन ने असेही म्हटले की, 'योग्य वेळ आल्यावर मी याबाबत काय तो निर्णय घेईन आणि घेतलेला निर्णय माझ्यासाठी योग्य आहे की नाही ते पाहणार. राजकारणातील इतर गोष्टींबद्दल मला खात्री नाही. त्यामुळे मला राजकारणाशी जुळायचे की नाही हे ठरवायचे आहे. मला खेळा मध्ये सहभागी व्हायला आवडेल. मला एक मार्गदर्शक किंवा कॉमेंट्री करताना पाहिले जाऊ शकते. मला क्रिकेटसोबत (Cricket) काहीतरी नवीन करायला तयार आहे.

जालंधरच्या हा खेळाडू मार्च 2016 मध्ये आशिया कपमध्ये यूएईविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. आणि त्यानंतर तो भारताकडून पुन्हा खेळू शकला नाही. जवळपास पाच वर्षे कोणतेही आंतरराष्ट्रीय क्रिकेट (international cricket)न खेळलेल्या हरभजन पुन्हा भारताचे प्रतिनिधित्व करू शकेल अशी अपेक्षा नव्हती. भारतीय ऑफस्पिनरने देशासाठी 103 कसोटी, 236 एकदिवसीय आणि 28 टी-20 सामने खेळले आहेत. कसोटीत 417 बळी, तर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये 294 बळी घेतले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amthane Dam: भर पावसातही ‘आमठाणे’ कोरडे! धरणात 5 टक्केच पाणी; पर्यटनावरही परिणाम

UTAA: प्रकाश वेळीपना धक्‍का! ‘उटा’च्या विद्यमान समितीवर निर्बंध; सभा-आर्थिक व्‍यवहार करण्यास मनाई

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT