Indian Football Team Dainik Gomantak
क्रीडा

SAFF Championship: टीम इंडियाची फायनलमध्ये धडक! गोलकिपर गुरप्रीत ठरला लेबनॉनविरुद्ध सेमीफायनलचा हिरो

Pranali Kodre

Indian Football Team enter SAFF Championship final: भारतीय फुटबॉल संघाने दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशीप (SAAF Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रेवश केला आहे. भारतीय संघाने शनिवारी (1 जुलै) रोमांचक उपांत्य सामन्यात लेबनॉन संघाला पेनल्टी शुटआऊटमध्ये 4-2 फरकाने पराभूत केले.

बंगळुरूमधील कांतीरावा स्टेडियमवर झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारत आणि लेबनॉन संघात निर्धारित वेळेनंतर 0-0 अशी बरोबरी झालेली होती. दोन्ही संघांना सामन्यात गोल करण्याच्या चांगल्या संधी मिळाल्या होत्या. पण कोणालाही गोल करता आला नाही. त्यामुळे सामना पेनल्टी शुटआऊटमध्ये गेला.

पेनल्टी शुटआऊटमध्ये भारतासाठी गोलरक्षक गुरप्रीत सिंग संधूची कामगिरी सर्वात महत्त्वाची ठरली. तोच भारताच्या विजयाचा नायक ठरला. गुरप्रीतने सर्वात आधी पेनल्टी शुटआऊटमध्ये लेबनॉनच्या हसन मातूकचा गोल आडवला. त्याने गोल आडवल्याने भारतीय संघातही आत्मविश्वास संचारला.

नंतर भारताकडून सुनील छेत्री, अन्वर अली, नाओरेन महेश सिंग आणि उदाता सिंग यांनी पेनल्टी शुटआऊटमध्ये अचूक निशाणा साधत गोल केले. तर लेबनॉनकडून पहिला शॉट चूकल्यानंतर वालिद शौर आणि मोहम्मद सादेक यांनी अचूक गोल केला होता.

पण अखेरच्या प्रयत्नात खलील बादेरचा निशाणा चूकला. त्याने मारलेल्या शॉटवर गुरप्रीतने चेंडू आडवला आणि भारताचा विजय निश्चित झाला. त्यामुळे भारताने अंतिम सामन्यात प्रवेशही केला.

दरम्यान, भारत आणि लेबनॉन गेल्या महिनाभरात तिसऱ्यांदा आमने-सामने होते. यापूर्वी गेल्या महिन्यात झालेल्या इंटरकॉन्टिनेंटल कप स्पर्धेत हे दोन संघ दोनदा आमने-सामने होते. यात भारताने विजय मिळवला होता.

आता दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ चॅम्पियनशीप स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यात कुवेतचा सामना करायचा आहे. अंतिम सामने 4 जुलैला बंगळुरूमधील कांतिरावा स्टेडियमवरच होणार आहे. कुवेतने उपांत्य सामन्यात बांगलादेशला 1-0 अशा फरकाने पराभूत केले आणि अंतिम सामना गाठला आहे.

यापूर्वी साखळी फेरीत भारत आणि कुवेत आमने-सामने आले होते, त्यावेळी दोन्ही संघात 1-1 अशी बरोबरी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT