Gujarat Giants Dainik Gomantak
क्रीडा

WPL 2023: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सलग तिसरा पराभव, गुजरात जायंट्सचा 11 धावांनी विजय

Gujarat Giants: गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 11 धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला विजय नोंदवला.

Manish Jadhav

WPL 2023: गुजरात जायंट्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा 11 धावांनी पराभव करत महिला प्रीमियर लीगमध्ये पहिला विजय नोंदवला.

दुसरीकडे, स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील आरसीबीला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगळुरुचा हा सलग तिसरा पराभव आहे. प्रथम फलंदाजी करताना गुजरात जायंट्सने 20 षटकांत 7 गडी गमावून 201 धावा केल्या.

प्रत्युत्तरात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला सोफी डिवाइनच्या दमदार अर्धशतकी खेळीमुळे 20 षटकांत 6 गडी गमावून केवळ 190 धावा करता आल्या.

दरम्यान, 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची (Royal Challengers Bangalore) सुरुवात चांगली झाली. मानधना आणि डिवाइनमध्ये पहिल्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी झाली.

पॉवरप्लेमध्ये बंगळुरुने 6 षटकांत 59 धावा केल्या. मात्र, मानधना बाद झाल्यानंतर एलिस पेरी आणि डिवाइन यांनी डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला, पण अतिशय संथ भागीदारी झाली. पेरी 25 चेंडूत 32 धावा करुन बाद झाली.

तर रिचा घोष 10 आणि कनिका 10 धावा करुन बाद झाल्या. सोफी डिवाइन 45 चेंडूत 66 धावा करुन बाद झाली. या खेळीत तिने 8 चौकार आणि 2 षटकार मारले.

तत्पूर्वी, फलंदाजीसाठी उतरलेल्या गुजरात जायंट्सला मेघनाच्या रुपाने पहिला धक्का बसला. तिला केवळ 8 धावा करता आल्या.

यानंतर सोफिया डंकलीने अवघ्या 18 चेंडूत अर्धशतक ठोकून पॉवरप्लेमध्ये गुजरातची धावसंख्या 64 धावांपर्यंत पोहोचवली. सोफिया 28 चेंडूत 65 धावा करुन बाद झाली. तिने आपल्या खेळीत 11 चौकार आणि तीन षटकार मारले.

हरलीन देओलनेही अर्धशतकी खेळी खेळली, त्यामुळे गुजरात (Gujarat) 200चा टप्पा पार करु शकला. गार्डनरने 19, हेमलताने 16 आणि सदरलँडने 14 धावा केल्या. देओल 45 चेंडूत 67 धावा करुन बाद झाली. हरलीनने या डावात 9 चौकार आणि 1 षटकार लगावला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर फसली 'थार'; नागालँडच्या राजधानीतला व्हिडिओ व्हायरल Watch

SCROLL FOR NEXT