Aryav Da Costa  Dainik Gomantak
क्रीडा

Aaryav Da Costa: गोव्याच्या आर्यवला मँचेस्टर युनायटेडचे तिकीट

एफसी गोवाचा युवा खेळाडू; ‘युनायटेड वुई प्ले’ उपक्रमातील कामगिरीनुसार निवड

किशोर पेटकर

Aaryav Da Costa: मडगाव येथील युवा गोमंतकीय फुटबॉलपटू आर्यव दा कॉस्ता याला मँचेस्टर युनायटेड अकादमीत सरावाची संधी लाभली आहे. तो एफसी गोवाच्या 13 वर्षांखालील संघाचे प्रतिनिधित्व करतो.

(Goan Football Player Will Practice in Manchester United Academy)

इंग्लिश प्रीमियर लीग संघ मँचेस्टर युनायटेडने अपोलो टायर्सच्या सहकार्याने भारतात ‘युनायटेड वुई प्ले’ ग्रासरुट फुटबॉल स्पर्धा घेतली होती. त्यात चौघे युवा फुटबॉलपटू विजेते ठरले, त्यात आर्यव हा एक आहे. तो मडगाव येथील रहिवासी आहे.

‘युनाईटेड वुई प्ले’ स्पर्धेची अंतिम फेरी मुंबई येथे झाली. या उपक्रमात देशभरातील 6600 उदयोन्मुख फुटबॉलपटूंनी भाग घेतला होता.

13 वर्षांखालील स्पर्धेत चमक

गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) 13 वर्षांखालील प्रथम विभागीय फुटबॉल स्पर्धेत यंदा एफसी गोवा संघाने विजेतेपद पटकावले. या संघाचे आर्यव याने प्रतिनिधित्व केले होते. ‘‘विजेत्यांपैकी मी एक असल्याच्या भावनेने रोमांचित बनलो असून हा सन्मान असल्याचे मानतो आणि पुढील संधीसाठी उत्साहित आहे.

हा विजय केवळ माझा एकट्याचा नसून माझा संघ, प्रशिक्षक आणि कुटुंबीय वाटेवारी आहेत, जे माझ्या बलस्थानाचे आधारस्तंभ आहेत,’’ अशी प्रतिक्रिया आर्यव याने दिली. या वर्षी जीएफए 13 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेत आर्यव याने आठ सामन्यांत 11 गोल केले होते, स्पर्धेत सर्वाधिक गोल केलेल्या खेळाडूंत त्याचा दुसरा क्रम होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'..मोबाईल कमी वापर'! आई ओरडली; 12 वर्षांची मुलगी दिल्लीच्या ट्रेनमध्ये चढली; घर सोडून गेलेली गोव्यातील 3 मुले सापडली उत्तर भारतात

Goa Government Job: गोव्यातील तरुणांसाठी खूशखबर! 8 हजार सरकारी पदे भरली जाणार; मोठी रोजगारसंधी

IFFI 2025: 'क्या रे भिडू, सब कुछ ठिक है ना...'! ‘रेड कार्पेट’वर जॅकीदांची हटके एंट्री; कमल हसन, मनोज वाजपेयीला पाहून चाहते खूश Video

Goa New Cricket Captain: गोवा T20 संघात मोठा बदल! हुकमी 'सुयश'कडे नेतृत्वाची धुरा; नवीन संघात कुणाला स्थान? पहा..

Baina Theft: 'पोलिसांनी शोधले असते तर, चोर सापडले असते'! बायणा दरोड्यातील जखमीचा धक्कादायक खुलासा; सांगितला संपूर्ण थरार

SCROLL FOR NEXT