Goa Officers Promotion
Goa Officers PromotionDainik Gomantak

Goa Officers Promotion: गोव्यातील 17 अधिकाऱ्यांचे प्रमोशन; आयोगाची शिफारस सरकारने केली मंजूर

कार्मिक खात्याने जारी केला बढतीचा आदेश
Published on

Goa Officers Promotion: गोवा नागरी सेवेतील 17 अधिकाऱ्यांची वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीतील ‘ए’ ग्रेड राजपत्रित अधिकारीपदी बढती देण्याची शिफारस खात्याअंतर्गत बढती समितीने केली आहे. त्यानुसार त्यांच्या या बढतीचा आदेश कार्मिक खात्याचे अवर सचिव इशांत व्ही. सावंत यांनी जारी केला आहे.

बढती देण्यात आलेल्या या अधिकाऱ्यांनी ते सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी काम सुरूच ठेवावे, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

(Goa Public Service Commission)

Goa Officers Promotion
Karnataka Election 2023: गोव्यातील बसेसचे कर्नाटकात काय काम? काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाकडे केली तक्रार

वरिष्ठ प्रशासकीय श्रेणीत बढती मिळालेल्यांमध्ये दीपक देसाई, व्ही. पी. डांगी, दीपक बांदेकर, विकास गावणेकर, दीपाली नाईक, राजू गावस, अँथनी डिसोझा, संध्या कामत, दामोदर मोरजकर, लावरा देऊस, वासुदेव शेट्ये, राजेंद्र मिरजकर, राजन सातार्डेकर, प्रवीण बरड, उपासना माजगावकर, प्रशांत शिरोडकर व संजीव गावस देसाई यांचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी गोवा लोकसेवा आयोगाने 8 मे रोजी या अधिकाऱ्यांच्या बढतीसंदर्भात सरकारकडे शिफारस केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com