Cricket Dainik Gomantak
क्रीडा

कुचबिहार क्रिकेट करंडकमध्ये पराभव टाळण्यासाठी गोव्याची धडपड

सुरवातीच्या चौघाही फलंदाजांनी शतके ठोकल्यामुळे तमिळनाडूने १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट (Cooch Behar Trophy Cricket) सामन्यात पहिला डाव 4 बाद 559 धावांवर घोषित केला.

किशोर पेटकर

पणजी: सुरवातीच्या चौघाही फलंदाजांनी शतके ठोकल्यामुळे तमिळनाडूने (Tamil Nadu) 19 वर्षांखालील कुचबिहार करंडक क्रिकेट (Cooch Behar Trophy Cricket) सामन्यात पहिला डाव 4 बाद 559 धावांवर घोषित केला. त्यानंतर गोव्याची डावाचा पराभव टाळण्यासाठी धडपड सुरू झाली. 308 धावांच्या पिछाडीनंतर त्यांची सामन्याच्या तिसऱ्या दिवस अखेर बुधवारी 2 बाद 104 अशी स्थिती होती. एलिट क गट सामना गुजरातमधील सूरत येथील लालभाई काँट्रेक्टर स्टेडियमवर सुरू आहे. गुरुवारी सामन्याचा शेवटचा दिवस आहे. दुसऱ्या डावात गोव्याला वीर यादव (34) व देवनकुमार चित्तेम (Devanakumar Chittem) (19) यांनी 52 धावांची सलामी दिली. दिवसअखेर इझान शेख 17, तर कर्णधार कौशल हट्टंगडी 28 धावांवर खेळत होता. त्यांची तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची अभेद्य भागीदारी केली आहे. गोव्याचा संघ अजून 204 धावांनी मागे आहे. त्यांनी पहिल्या डावात 251 धावा केल्या होत्या.

तमिळनाडूच्या एस. आर. आतिश (115) व बी. सचिन (102) यांनी काल शतके ठोकली होती. बुधवारी ए. बद्रिनाथ (नाबाद 145) व कर्णधार एम. भूपती वैष्णकुमार (169) यांनीही शतक नोंदवून गोव्याच्या गोलंदाजांना दमविले. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 280 धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव ः 251 व दुसरा डाव ः 37 षटकांत 2 बाद 104 (वीर यादव 34, देवनकुमार चित्तेम 19, इझान शेख नाबाद 17, कौशल हट्टंगडी नाबाद 28).

तमिळनाडू, पहिला डाव ः 125.4 षटकांत 4 बाद 559 घोषित (एस. आर. आतिश 115, बी. सचिन 102, ए. बद्रिनाथ नाबाद 145, एम. भूपती वैष्णकुमार 169, व्ही. पी. अमित सात्विक 16, फरदीन खान 16-4-59-1, विनायक कुंटे 13-3-470-0, उदित यादव 21-2-90-0, दीप कसवणकर 45-7-१115-1, मनीष काकोडे 16.4-2-95-1, कौशल हट्टंगडी 4-0-21-0, सनथ नेवगी 4-0-32-0, देवनकुमार चित्तेम 6-0-55-1).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Akshay Kumar Property: मॉरिशस, कॅनडा आणि गोव्यात आलिशान व्हिला... 2,500 कोटींची संपत्ती आणि गाड्यांचा ताफा; 'अशी' आहे बॉलीवूडच्या 'खिलाडी'ची जीवनशैली

आमका आयआयटी नाका! कोडार येथे प्रकल्प नको म्हणून ग्रामस्थ एकवटले Watch Video

IIT Goa: 'गोव्यात येणाऱ्या प्रत्येक प्रकल्पाला विरोध करण्याची सवय लागलीय...'; प्रस्तावित आयआयटीवरुन मुख्यमंत्री प्रमोद सावंतांचा विरोधकांवर प्रहार

Gold Price: सोन्याच्या दरांनी मोडले सगळे रेकॉर्ड! एकाच दिवसात तब्बल 'इतक्या' हजारांची वाढ, 10 ग्रॅम सोन्याचा भाव पुन्हा 1 लाख पार

वडिलांनी फोन काढून घेतला, मुलाचा संताप अनावर; मोबाईलच्या वेडापायी उचललं 'चुकीचं पाऊल'

SCROLL FOR NEXT