Goas position is strong in C K Naidu Trophy  Dainik Gomantak
क्रीडा

सी. के. नायडू करंडकमध्ये गोव्याची स्थिती मजबूत

130 धावांची आघाडी ः हिमाचल प्रदेशविरुद्ध मंथन, विश्वंबरची अर्धशतके

किशोर पेटकर

पणजी ः मंथन खुटकर व विश्वंबर काहलोन यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट सामन्यात गोव्याने बुधवारी दुसऱ्या दिवशी मजबूत  स्थिती गाठली. त्यांनी हिमाचल प्रदेशवर पहिल्या डावात 130 धावांची महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली.

अळूर-बंगळूर येथे सामना सुरू आहे. मंथनचे (89) शतक अकरा धावांनी हुकले, त्याने विश्वंबरसह (55) गोव्याच्या पहिल्या डावास उभारी दिली.गोव्याने हिमाचल प्रदेशच्या 193 धावांना उत्तर देताना सर्वबाद 323 धावा केल्या.चहापानानंतर गोव्याचे जम बसलेले विश्वंबर आणि तुनीष सावकार हे जम बसलेले फलंदाज बाद झाले, तसेच 40 धावांत अखेरच्या 5 विकेट गमावल्या, त्यामुळे आघाडी दीडशे धावांच्या पुढे जाऊ शकली नाही. हिमाचलच्या रितिक कुमार याने 77 धावांत 6 गडी बाद केले. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर एका षटकाच्या खेळात हिमाचलने बिनबाद चार धावा केल्या.

मंथनची चमकदार फलंदाजी

अगोदरच्या दोन सामन्यात विशेष छाप पाडू न शकलेल्या डावखुऱ्या मंथनने हिमाचल प्रदेशविरुद्ध चमकदार फलंदाजी केली. काल पहिल्या दिवसअखेर तो 42 धावांवर नाबाद होता. बुधवारी त्याने कश्यप बखले (26) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी 54 धावांची भागीदारी केली. नंतर विश्वंबर काहलोनसह तिसऱ्या विकेटसाठी 42 धावांची भर टाकली. उपाहारापूर्वी मंथनला रितिक याने त्रिफळाचीत बाद केले, त्यामुळे त्याचे मोसमातील पहिले शतक हुकले. 174 चेंडूंतील खेळीत त्याने डझनभर चौकार लगावले.

विश्वंबरची संयमी खेळी

मंथन बाद झाल्यानंतर विश्वंबरने कर्णधार दीपराज गावकर (24) व तुनीष सावकार (38) यांच्यासमेवत गोव्याच्या डावाला स्थैर्य दिले. विश्वंबर व तुनीष यांनी पाचव्या विकेटसाठी 61 धावांची भागीदारी केली. चहापानानंतर गोव्याची पडझड झाली. रितिकने तुनीषला बाद करून जम बसलेली जोडी फोडली. अर्धशतक पूर्ण केल्यानंतर विश्वंबर रितिकच्याच गोलंदाजीवर त्रिफळाचित बाद झाला आणि नंतर गोव्याचे शेपूट जास्त प्रतिकार करू शकले नाही. विश्वंबरने संयमी खेळीत 179 चेंडूंचा सामना करताना चार चौकार मारले.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश, पहिला डाव ः 193 व दुसरा डाव ः बिनबाद 4

गोवा, पहिला डाव (1 बाद 92 वरून) ः 116.1 षटकांत सर्वबाद 323 (मंथन खुटकर 89, कश्यप बखले 26, विश्वंबर काहलोन 55, दीपराज गावकर 24, तुनीष सावकार 38, सोहम पानवलकर नाबाद 23, आदित्य सूर्यवंशी 0, मोहित रेडकर 24, ऋत्विक नाईक 2, शुभम तारी 0, जयशोधन ठाकूर 2-70, रितिक कुमार 40.1-10-77-6, राहुल चौहान 1-24).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Borim Accident: बोरी येथे भीषण अपघात! काँक्रिटवाहू ट्रकची कारला धडक, लहान मुलांसह 6 जण जखमी; तेलंगणातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर

Asia Cup: फलंदाजी आणि गोलंदाजीत सचिनचा दबदबा! आशिया कपमधील मास्टर ब्लास्टरचा 'तो' ऐतिहासिक रेकॉर्ड आजही अबाधित

Goa Assembly Speaker: गोवा विधानसभेला मिळणार नवा अध्यक्ष, राज्यपालांनी बोलावले विशेष अधिवेशन; रमेश तवडकरांनंतर कोणाची लागणार वर्णी?

Chandragrahan 2025: धनलाभ की नुकसान? भाद्रपद पौर्णिमेचे चंद्रग्रहण 'या' राशींसाठी ठरू शकते अशुभ; 12 राशींवर काय होईल परिणाम?

Viral Video: विशाल देह पण कोमल मन...! हत्तीणीचा इमोशनल व्हिडिओ व्हायरल, माणसावरील प्रेम पाहून यूजर्संना अश्रू अनावर

SCROLL FOR NEXT