Boxing team kishor petkar
क्रीडा

बॉक्सिंगमध्ये गोव्याला सहा पदके

पश्चिम विभागीय सबज्युनियर मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याने सहा पदके

दैनिक गोमन्तक

पणजी : गुजरातमध्ये झालेल्या पश्चिम विभागीय सबज्युनियर मुलांच्या बॉक्सिंग स्पर्धेत गोव्याने सहा पदके जिंकली. यामध्ये एक सुवर्ण, चार रौप्य व एका ब्राँझपदकाचा समावेश आहे. (Goa won six medals in boxing)

या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात आणि गोव्यातील बॉक्सर (Boxer) सहभागी झाले होते. गोव्याच्या संघाला चितंबरम नाईक, विश्वनाथ गोवेकर व संतोष बिरमोळे यांच्या मार्गदर्शन लाभले.

गोव्याच्या (Goa) अथर्व चौधरी याने ६१-६४ किलोगटात सुवर्णपदक (Gold Medal) जिंकले. अंतिम लढतीत त्याने महाराष्ट्राच्या (Maharashtra) बॉक्सरवर मात केली. हेमंत हळ्ळी (४३-४६ किलो), केतन वाळके (३७-४० किलोगट), सौरभ हसबे (६७-७० किलो) व साहिल सिंग (४०-४३ किलो) यांना अंतिम फेरीत पराभूत झाल्यामुळे रौप्यपदक मिळाले.

तर रौनक निम्बोरिया याला ४६-४९ किलोगटात उपांत्य फेरीत हार पत्करावी लागली, त्यामुळे त्याला ब्राँझपदकावर (Bronze Medal) समाधान मानावे लागले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Curchorem: कुडचडे रेल्वे स्टेशनलगतच्या शौचालयाची नळजोडणी तोडली, आस्थापनाची 2.75 लाखांची थकबाकी

Trump Tariff Policy: ट्रम्प यांची ‘टॅरिफ’ पॉलिसी फसली! अमेरिकेत वाढली बेरोजगारी, महागाईनेही गाठला नवा उच्चांक

School Discipline: कच्च्या मडक्यांना योग्य वळण देणारी शाळेची शिकवण; विद्यार्थी आणि शिक्षकांची अविस्मरणीय गाथा

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

SCROLL FOR NEXT