Goa's women fall due to run-out in women's T20 cricket Dainik Gomantak
क्रीडा

महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत धावबादमुळे गोव्याच्या महिलांची घसरण

शिखाचे एकहाती प्रयत्न : बडोद्याविरुद्ध हरल्यामुळे उपउपांत्यपूर्व फेरीत

Kishor Petkar

Goa Sports News : बडोद्याने विजयासाठी 137 धावांचे आव्हान दिल्यानंतर हुकमी फलंदाज संजुला नाईक सुरवातीस धावबाद झाली, त्यानंतर डावाच्या अंतिम टप्प्यात आणखी तिघी जणी धावबाद झाल्यामुळे गोव्याची झुंज अपयशी ठरली आणि कर्णधार शिखाचे एकहाती प्रयत्नही निष्फळ ठरले.

सामना 10 धावांनी गमावल्यामुळे गोव्याला सीनियर महिला टी-20 क्रिकेट स्पर्धेत पहिल्या पराभवास सामोरे जावे लागले आणि परिणामी स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत जावे लागले. सामना रविवारी मोहाली येथील आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर झाला. (Goa's women fall due to run-out in women's T20 cricket)

गटात दुसरा क्रमांक

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बडोद्याने 7 बाद 136 धावा केल्या. उत्तरादाखल गोव्याला 9 बाद 126 धावाच करता आल्या. बडोदा व गोव्याचे प्रत्येकी चार विजय व एका पराभवामुळे समान 16 गुण झाले. धावसरासरीत बडोद्यास (+0.673) एलिट ड गटात पहिला क्रमांक मिळाला व ते थेट उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. +0.129 धावसरासरीसह गोव्याला दुसरा क्रमांक मिळाला.

शिखाच्या सर्वाधिक 46 धावा

उत्तर प्रदेशविरुद्ध मागील लढतीत नाबाद अर्धशतक केलेली सलामीची संजुला नाईक वैयक्तिक 15 धावांवर धावबाद झाली. नंतर पूर्वजा वेर्लेकर व तेजस्विनी दुर्गड लगेच परतल्यामुळे गोव्याचा डाव अडचणीत आला. कर्णधार शिखा पांडेने किल्ला लढविताना सुनंदा येत्रेकरसह (16) चौथ्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. सुनंदा यष्टिचीत बाद झाली. नंतर विजयासाठी 34 धावा हव्या असताना फिरकी गोलंदाज राधा यादव हिने यष्टीमागे यास्तिका भाटिया हिच्याकरवी शिखाला झेलबाद केल्यामुळे गोव्याला मोठा झटका बसला. शिखाने चिवट झुंज देताना 36 चेंडूंत चार चौकार व एका षटकाराच्या मदतीने 46 धावा केल्या.

संक्षिप्त धावफलक

बडोदा : 20 षटकांत 7 बाद 136 (पी. ए. पटेल 22, तरन्नुम पठाण 44, यास्तिका भाटिया 27, राधा यादव 33, शिखा पांडे 1-18, निकिता मळीक 0-11, मेताली गवंडर 0-4, सुनंदा येत्रेकर 2-30, पूर्वा भाईडकर 0-24, रुपाली चव्हाण 1-20, संजुला नाईक 0-17, तेजस्विनी दुर्गड 1-12) वि. वि. गोवा : 20 षटकांत 9 बाद 126 (पूर्वजा वेर्लेकर 10, संजुला नाईक 15, तेजस्विनी दुर्गड 8, शिखा पांडे 46, सुनंदा येत्रेकर 16, विनवी गुरव 4, निकिता मळीक 17, पूर्वा भाईडकर 1, तनया नाईक 0, मेताली गवंडर नाबाद 6, रुपाली चव्हाण नाबाद 1, एन. वाय. पटेल 1-29, तरन्नुम पठाण 1-30, राधा यादव 1-18, केशा 1-15, रिधी 1-16).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: रणजी क्रिकेटमध्ये गोव्याचा कर्णधार दर्शन मिसाळ चमकला

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT