महाराष्ट्रातील धुळे येथे २८व्या राष्ट्रीय सबज्युनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत विजेतेपद पटकावलेला गोव्याचा मुलांचा संघ. सोबत मान्यवर. Dainik Gomantak
क्रीडा

गोव्याला राष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटमध्ये विजेतेपद; अंतिम लढतीत हरियानावर 22 धावांनी मात

किशोर पेटकर

Sub Juniour Tennis Ball Cricket: गोव्याच्या सबज्युनियर मुलांच्या टेनिस बॉल क्रिकेट संघाने सोमवारी 28 व्या राष्ट्रीय स्पर्धेत विजेतेपद पटकावले. महाराष्ट्रातील धुळे येथे झालेल्या या स्पर्धेत त्यांनी अंतिम लढतीत हरियानावर 22 धावांनी मात केली.

अंतिम लढतीत गोव्याने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 8 षटकांत 7 बाद 71धावा केल्या. साईश नाईक याने 23, सरोज ठाकूर याने 20, तर विराज तारी याने 13 धावा केल्या. उत्तरादाखल हरियानाला निर्धारित 8 षटकांत 7 बाद 49 धावाच करता आल्या.

तुषार नाईक याने 8 धावा देऊन 4 गडी बाद केले. साईश केरकर व सरोज ठाकूर यांनी प्रत्येकी एक फलंदाज बाद केला. गोव्याचा साईश नाईक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

प्रतीक गावडे याच्या नेतृत्वाखालील विजेत्या संघात साईश नाईक, विराज तारी, तुषार नाईक, ओमकार पाटील, साईश केरकर, निषाद पागी, शुभम वेळीप, सरोज ठाकूर, चैतन्य गावडे, प्रतीक लमाणी, सौरव गावकर, तनीष भंडारी या खेळाडूंचा समावेश होता.

संघाला प्रशिक्षक अजिंक्य नाईक, व्यवस्थापक रामदास वरक, मेंटॉर प्रणय गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

‘‘गोवा टेनिस बॉल क्रिकेट संघटना आणि विशेषतः गोवा संघ यांचे चमकदार कामगिरीबद्दल आणि राज्याला गौरव मिळवून दिल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!’’

- ॲड. कार्लोस फेरेरा, आमदार, हळदोणा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Thivim News: डोंगर उद्‌ध्वस्त करू देणार नाही! थिवीवासीयांची ‘वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी' विरुद्ध वज्रमूठ

Rashi Bhavishya 7 October 2024: आनंदी आनंद गडे! सर्व कामे लागणार चुटकीसरशी मार्गी; जाणून घ्या कसा असेल तुमचा दिवस

Sunburn Festival 2024: कामुर्ली ग्रामस्थांच्या लढ्याला यश! 'सनबर्न'चा प्रस्ताव सर्वांनुमते फेटाळला

Panaji Smart City: 'स्मार्ट सिटी'त कामांचा धूमधडाका! '18 जून'सह तीन मार्गांचे काम लवकरच सुरु होणार

Goa Navratri 2024: छत्रपती शिवाजी महाराजांचे गोव्यात आगमन होण्यापूर्वीचे देवीचे मंदिर कोणते माहितीये?

SCROLL FOR NEXT