Goa Sports विनय तेंडुलकरांना बुद्धिबळात दणका Dainik Gomantak
क्रीडा

विनय तेंडुलकरांना बुद्धिबळात दणका

गोवा बुद्धिबळ संघटना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चौघांचे उमेदवारी अर्ज फेटाळत निवडणूक बिनविरोध घोषित केली होती.

दैनिक गोमन्तक

पणजी: अखिल भारतीय बुद्धिबळ (Chess) महासंघाच्या नैतिकता आयोगाने गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणूक प्रक्रियेतील त्रुटींवर बोट ठेवत पदाधिकारी पदासाठी मतदान घेण्याचा आदेश दिला आहे. परिणामी राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्या गटाला हा दणका मानला जातो.नवी दिल्लीस्थित नैतिकता आयोगाने गोवा बुद्धिबळ संघटना निवडणुकीतील चार उमेदवार महेश कांदोळकर, आशेष केणी, विश्वास पिळर्णकर, अमोघ नमशीकर यांच्या तक्रारीची दखल घेत हा निर्णय दिला आहे. गोवा बुद्धिबळ संघटना निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी या चौघांचे उमेदवारी अर्ज फेटाळत निवडणूक बिनविरोध घोषित केली होती.

त्याविरोधात या चौघांही उमेदवारांनी महासंघाच्या नैतिकता आयोगाकडे दाद मागितली होती. याप्रकरणी नैतिकता आयोगाने 16 ऑक्टोबर रोजी सुनावणी पूर्ण करून 19 ऑक्टोबरला आदेश जारी केला. त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी व निवडणूक निर्णय उपअधिकारी यांना नैतिकता आयोगाने जारी केलेल्या आदेशाच्या तारखेपासून दोन आठवड्यांत गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीतील पदाधिकाऱ्यांच्या जागेसाठी तक्रार केलेल्या उमेदवारांसह मतदान घेण्याचे बजावले असल्याची माहिती तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेचे खजिनदार आणि गोवा बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत उपाध्यक्षपदी बिनविरोध ठरलेले अरविंद म्हामल यांनी दिली.

बुद्धिबळ संघटनेच्या निवडणुकीत अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या तारखेस पाच ऑगस्ट रोजी अरविंद म्हामल (उपाध्यक्ष, उत्तर गोवा), सत्यवान हरमलकर (उपाध्यक्ष, उत्तर गोवा), तुकाराम शेट्ये (संयुक्त सचिव, उत्तर गोवा) आणि कालिदास हरवळकर (संयुक्त सचिव, उत्तर गोवा) हे चार उमेदवार बिनविरोध ठरले होते. छाननीनंतर 22 ऑगस्ट रोजी नियोजित असलेल्या निवडणुकीसाठी अध्यक्ष, सचिव, खजिनदार, संयुक्त खजिनदार, उपाध्यक्ष दक्षिण गोवा व संयुक्त सचिव दक्षिण गोवा या पदांसाठी मतदान होणार होते. पण 10 ऑगस्ट रोजी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही उमेदवारांचे अर्ज फेटाळत निवडणूक बिनविरोध जाहीर केली. त्याला 22 ऑगस्टच्या आमसभेत मान्यता मिळाल्याचेही जाहीर केले. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी भाजप नेते तथा राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांच्यासमोर महेश कांदोळकर यांचे आव्हान होते. तसेच सचिव पदासाठी आशेष केणी आणि शरेंद्र नाईक यांच्यात, तर खजिनदार पदासाठी किशोर बांदेकर आणि विश्वास पिळर्णकर यांच्यात थेट लढत होती.

दिल्ली उच्च न्यायालयात दाद?

प्राप्त माहितीनुसार, अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाने दिलेल्या आदेशासंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्यासंबंधीच्या हालचाली खासदार तेंडुलकर यांच्या गटाने केल्या आहेत. यासंबंधी खासदार तेंडुलकर अथवा त्यांच्या गटातील सदस्यांशी संपर्क होऊ शकला नाही.

अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाचा आदेश हा महेश कांदोळकर यांच्या नेतृत्वाखालील गटाचा मोठा विजय आहे. एकसंध राहिलेल्या पेडणे, बार्देश, डिचोली, सत्तरी, तिसवाडी, फोंडा, सासष्टी या सातही तालुक्यांचा हा नैतिक विजय आहे.

- अरविंद म्हामल, पदाधिकारी, तिसवाडी तालुका संघटना.

पुढे काय होणार?

  • अखिल भारतीय बुद्धिबळ महासंघाच्या नैतिकता आयोगाचा आदेश मानणे बंधनकारक.

  • आदेशाचे पालन झाले नाही, तर महासंघ गोवा बुद्धिबळ संघटनेस निलंबित करू शकतो.

  • राज्य संघटनेवर अस्थायी समिती नियुक्त करण्याच्या अधिकाराचा वापर महासंघाकडून शक्य.

  • राज्य संघटना निलंबित झाल्यास गोव्यातील बुद्धिबळपटूंना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांत सहभागी होणे अशक्य.

  • राज्य संघटनेचे अनुदानही रोखले जाण्याचाही संभव, गोव्यात होणाऱ्या ग्रँडमास्टर स्पर्धेलाही मान्यता नसेल.

  • थोडक्यात गोवा बुद्धिबळ महासंघाच्या आदेशाचे पालन केले नाही, तर राज्यातील बुद्धिबळपटूंचे नुकसान शक्य.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa History: 1380 ते 1470 मध्ये संपूर्ण गोव्याची भरभराट झाली; विजयनगरचा प्रतापी सम्राट देवराय

Australian Open 2026: नव्या युगाची नांदी, 'अल्काराज' ठरला टेनिसचा नवा किंग! नोवाक जोकोविचचा पराभव करुन पटकावलं पहिलं ऑस्ट्रेलियन ओपन जेतेपद VIDEO

Balochistan Violence: दमन आणि अत्याचाराचा पाकड्यांचा इतिहास...! बलुचिस्तानमधील हिंसाचारावरुन चिखलफेक करणाऱ्यांना भारताचं चोख प्रत्युत्तर

Budh Gochar 2026: फेब्रुवारीत बुध ग्रहाची 'ट्रिपल चाल' पालटणार नशीब! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सुवर्णकाळ; व्यापाऱ्यांसाठी आनंदाची बातमी

Illegal Beef Trafficing: चोर्ला घाटात मध्यरात्री थरार! पाच गायींच्या मांसासह दोन तस्कर पोलिसांच्या जाळ्यात; 20 वर्षीय तरुणाला बेड्या

SCROLL FOR NEXT