Goa Sports: Srinivas Dhempe honors boxing technical officer Lenny D`gama. Along with MLA Rohan Khaunte, Vasant Prabhudesai, Hemant Nagvekar. Dainik Gomantak
क्रीडा

Goa Sports: राज्यातील बॉक्सिंगला ‘धेंपो’चे पाठबळ

Goa Sports: ‘सदिच्छादूत’ योजनेअंतर्गत युवा बॉक्सरना मिळणार आर्थिक साह्य

किशोर पेटकर

पणजीः धेंपो उद्योगसमूहातर्फे गोव्यातील क्रीडापटूंना (Goa Sportspersons) ‘सदिच्छादूत’ योजनेअंतर्गत आर्थिक पाठबळ दिले जाते, त्याच धर्तीवर राज्यातील प्रतिभाशाली युवा बॉक्सरना मदत करण्यासाठी आपला समूह सदैव तत्पर राहील, अशी ग्वाही उद्योगपती श्रीनिवास धेंपे (Shrinivas Dempo) यांनी बुधवारी दिली. टोकियो ऑलिंपिकमधील बॉक्सिंग स्पर्धेत मूल्यांकनकर्ते या नात्याने योगदान दिलेले गोव्याचे आंतरराष्ट्रीय तांत्रिक अधिकारी (आयटीओ) लेनी डिगामा (Lenny D`Gama) यांच्या सत्कार सोहळ्यात धेंपे बोलत होते.सत्कार सोहळ्यास गोवा बॉक्सिंग असोसिएशनचे (Goa Boxing Association) अध्यक्ष आमदार रोहन खंवटे (Rohan Khaunte), गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक वसंत प्रभुदेसाई, संघटनेच्या सचिव दानुष्का डिगामा, खजिनदार हेमंत नागवेकर यांची उपस्थिती होती.

धेंपो उद्योसमूहाने फुटबॉल क्लबव्यतिरिक्त युवा फुटबॉलपटूंसाठी जुने गोवे येथे अद्ययावत फुटबॉल अकादमी सुरू केली आहे. तेथे खेळाडूंना प्रशिक्षण, आहार, निवास, शिक्षण यांची मोफत सोय आहे. सदिच्छादूत योजनेअंतर्गत बुद्धिबळ, टेनिसमधील प्रतिभावंत खेळाडूंनाही यापूर्वी साह्य करण्यात आले आहे. त्याच धर्तीवर धेंपो उद्योगसमूह बॉक्सरना मदतीचा हात देईल. आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकणे शक्य व्हावे या हेतूने गुणवान बॉक्सरची सदिच्छादूत योजनेअंतर्गत निवड केली जाईल, असे धेंपे यांनी नमूद केले. आमदार खंवटे यांनी यावेळी बोलताना, राज्य सरकारतर्फे साधनसुविधा तयार करत असताना गुणवत्तेला खतपाणी घालण्याची गरज प्रतिपादली. त्यासाठी अकादमीच्या धर्तीवर प्रशिक्षण व्यवस्था आवश्यक असल्याचे ते म्हणाले. बॉक्सिंगमध्ये गोमंतकीय पदके जिंकू शकतात, मात्र त्यासाठी पाठिंबा हवा असल्याचे त्यांनी सांगितले. गोवा सरकार व गोवा क्रीडा प्राधिकरणाच्यावतीने लेनी डिगामा यांचा सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती वसंत प्रभुदेसाई यांनी दिली. नियोजित कार्यक्रमानुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सोहळ्यास उपस्थित राहणार होते. पण व्यस्त वेळापत्रकामुळे ते येऊ शकले नाहीत.

लेनीकडून रक्कम बॉक्सिंगला...

धेंपो उद्योसमूहाचे प्रमुख श्रीनिवास धेंपे यांनी लेनी डिगामा यांना प्रोत्साहनपर एक लाख रुपयांचा साह्यनिधी जाहीर केला. या रकमेतील पन्नास टक्के रक्कम गोवा बॉक्सिंगसाठी, तर २५ टक्के रक्कम आंतरराष्ट्रीय सुवर्णपदक जिंकणाऱ्या राज्य बॉक्सरला देण्याचे डिगामा यांनी घोषित केले. गोवा हौशी बॉक्सिंग संघटनेतर्फे लेनी यांना आमदार रोहन खंवटे यांच्या हस्ते २५ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. ही रक्कमही त्यांनी गोवा बॉक्सिंगला दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT