Honorable while inaugurating the Badminton Court, Siolim, Goa. Santosh Govekar / Dainik Gomantak
क्रीडा

Goa: शरीराचे संतुलन तसेच पिळदारपणा राखण्यासाठी खेळ आवश्यक

जनतेला नागपंचमी सणाच्या पुर्वसंध्येला आवश्यक कडधान्याचे मोफत वाटप (Goa)

Dainik Gomantak

जीवनात शारिरीक समतोल राखण्यासाठी (Maintaining Body Balance) खेळाची नितांत आवश्यकता आहे. बॅटमिंटन (Badminton) सारखा खेळ कुठल्याही वयाच्या तंदुरुस्त व्यक्तीला शरीराचे मांसल  संतुलन आणी शरीराचा पिळदारपणा (Flexible Body) राखण्यासाठी सतत मदत करत असतो. एकेकाळी बेडमिंटन खेळात राज्यस्तरीय खेळाडू निर्माण करणार्या शिवोलीत (Siolim) मध्यंतरीच्या काळात गडप झालेल्या या खेळाला उर्जितावस्था देण्यासाठी  समर्थन संघटणेच्या सहकार्याने स्थानिक स्वामी समर्थ मठाच्या आवारात बॅटमिंटन कोर्टची (Badminton Court) स्थापना करण्यात येत असून  येथील मैदान दिवसभर सर्वासाठी खुले राहाणार असल्याचे मठाचे अध्यक्ष निलेश वेर्णेकर यांनी सांगितले.

यावेळी व्यासपीठावर जुने बॅटमिंटनपटु सर्वश्री दयानंद नायक, कालीदास गोवेकर, किशोर गोवेकर, उमाकांत चोडणकर, तसेच समर्थन संघटणेचे सचीव यदुवीर सिमेपुरुषकर आणी मठाचे सल्लागार संदीप वेर्णेकर उपस्थित होते. यावेळी, पंचक्रोशीतील गोर गरीब जनतेला नागपंचमी सणाच्या पुर्वसंध्येला आवश्यक कडधान्याचे मोफत वाटप समर्थन संघटनेच्यावतीने करण्यात आले. दरम्यान, यावेळी शिवोली पंचक्रोशीतील जुन्या बॅटमिंटनपटू दयानंद नायक, किशोर गोवेकर तसेच उमाकांत चोडणकर यांनी शिवोलीत नव्याने होऊं घातलेल्या बेडमिंटन कोर्टबद्दल समाधान व्यक्त करतांनाच स्वामी समर्थ मठाच्या आवारात ही सोय सर्वासाठीच मोफत उपलब्ध करून दिल्याबद्दल स्थानिक समर्थन संघटणेचे आभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुदेश किनळेकर यांनी तर आभार प्रदर्शन यदुवीर सिमेपुरुषकर यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT