Hadfade Dainik Gomantak
क्रीडा

9 व्या राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती स्पर्धेचे हडफडेत आयोजन

नगरसेवक शशांक नार्वेकर (Shashank Narvekar) यांच्‍या विशेष उपस्थितीत 31 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

दैनिक गोमन्तक

म्हापसा: ‘दी ट्रेडिशनल व्रेसलिंग ॲण्ड पांक्रेशन असोसिएशन ऑफ गोवा’ तर्फे 9 वी राष्ट्रीय पारंपरिक कुस्ती व तत्सम क्रीडाप्रकारांची स्पर्धा हडफडे- बार्देश येथील मेझन्स लेक विव रीसॉर्ट संकुलात 30 व 31 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या स्पर्धेचे उद्‍घाटन कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो (Michael Lobo) यांच्‍या हस्ते 30 रोजी दुपारी 12 वाजता होणार आहे. तसेच, समारोप सोहळा म्हापशाचे नगरसेवक शशांक नार्वेकर (Shashank Narvekar) यांच्‍या विशेष उपस्थितीत 31 रोजी सायंकाळी 5 वाजता होणार आहे.

गोव्याचे संघ पुढीलप्रमाणे आहेत: महिला गट: अहद मुल्ला, अफिफा मुल्ला, आसिया साईकलगर, अफिया साईकलगर, साक्षी नाईक, सुदीक्षा कोरगावकर, रोशनी लुकूर, खुशी साखळकर, सेजल पार्सेकर, नम्रता सनदी व आरोही कांबळे. पुरुष गट: शिवेन नार्वेकर, खलीद मनेर, नुमान सय्यद, राजा शेटये, क्रिशित साखळकर, अली साइकलगर, अरीफ साईकलगर, नेहल सनदी, महम्मद सय्यद, झलगाई रोहिमी, नंदीश बागायतकर, दुर्गेश कोडबल, अफराझ साकाली, साथवत खलप, सैफ मुल्ला, झाइद मुल्ला, अज्ञान सय्यद, रुद्र कांबळे, आझन सय्यद व हुसेन माणिपुरी.

स्पर्धेचा गोवा हा यजमान संघ प्रशिक्षक हुसेन मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली गोव्यासाठी जास्तीत जास्त पदके मिळवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे ‘दी ट्रेडिशनल व्रेसलिंग ॲण्ड पांक्रेशन असोसिएशन ऑफ गोवा’च्या अध्यक्ष मधुमिता नार्वेकर यांनी या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. या स्पर्धेत देशभरातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विविध वयोगटांतील महिला व पुरुष अशा दोन्ही विभागांतील सहाशेपेक्षा जास्त स्पर्धकांचा सहभाग असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT