Goa's Surfer Sugar surfing in competition (Goa) Kishor Petkar / Dainik Gomantak
क्रीडा

Goa: गोव्याच्या शुगरला राष्ट्रीय सर्फिंगमध्ये रौप्य

शुगर आल्त-पर्वरी येथील रहिवासी असून मोरजी येथे प्रशिक्षण घेत आहे (Goa)

किशोर पेटकर

पणजी: गोव्याची पंधरा वर्षीय सर्फर (Goan Surfer) शुगर शांती बनारसे (Sugar Shanti Banarase) हिने तमिळनाडूतील कोवालम (Kovalam, Tamil Nadu) येथे झालेल्या राष्ट्रीय कोव्हेलाँग क्लासिक सर्फिग (Covhalong Classic Surfing) आणि स्टँड अप पॅडलिंग स्पर्धेत (Stand up Paddling Competition) रौप्यपदक जिंकले (Win Silver medal). महिलांच्या खुल्या गटात तिला दुसरा क्रमांक मिळाला. शुगर हिचे प्रशिक्षक एडी रॉड्रिग्ज (Coach Rodriguez) यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्पर्धा 9 ते 11 ऑगस्ट या कालावधीत झाली. शुगर आल्त-पर्वरी (Alto - Porvorim) येथील रहिवासी असून मोरजी (Morjim) येथील ऑक्टोपस सर्फ स्कूल (Octopus Surf School) येथे गेल्या तीन वर्षांपासून प्रशिक्षण घेते.

" हा अतिशय विस्मयकारक अनुभव आहे आणि आता मी माझ्या पुढील स्पर्धेचा विचार करत आहे. आता मी सर्फिंगला जास्त वेळ देणार असून या खेळात आणखी मुली याव्यात यासाठी प्रयत्न करेन," अशी प्रतिक्रिया पदक जिंकल्यानंतर आनंदित झालेल्या शुगर हिने दिली. तिचे प्रशिक्षक रॉड्रिग्ज 2015 पासून सर्फ स्कूल चालवत आहेत. "आमच्या स्कूलमध्ये सध्या तीसपेक्षा जास्त युवा प्रशिक्षणार्थी आहेत. 16 वर्षांखालील प्रशिक्षणार्थींना मी मार्गदर्शन करत आहे. याशिवाय अधिक वयातील प्रशिक्षणार्थींसाठीही सुविधा आहे," असे रॉड्रिग्ज यांनी नमूद केले. गोव्यात सर्फिंग खेळाचा पाया रचणे हाच स्कूल सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश होता, असेही त्यांनी सांगितले.

कोवालम येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत खुल्या गटात तमिळनाडूच्या सृष्टी सेल्वम हिने महिलांत, तर त्याच राज्याच्या डी. मणिकंदन याने पुरुष गटात विजेतेपद मिळविले. यंदा टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत सर्फिंग खेळाचा प्रथमच समावेश करण्यात आला होता, साहजिकच भारतातही आता या खेळास महत्त्व प्राप्त होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Odisha Crime: हॉस्टेलमध्ये झोपलेल्या 8 विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत टाकले 'फेव्हिक्विक', वर्गमित्रांच्या कृत्यानं उडाला थरकाप

Hardik Pandya Record: भारत-पाक हायव्होल्टेज सामन्यात हार्दिक पांड्या रचणार इतिहास, चहलचा विक्रम धोक्यात; फक्त एवढी कामगिरी केली की झालं…

मांद्रे समुद्रकिनाऱ्यावर बेकायदेशीर शेक् रेस्टॉरंट; पर्यटन खात्याच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

TVS Jupiter: खास तुमच्यासाठी! दमदार इंजिन, स्टायलिश लूक आणि आधुनिक फीचर्ससह 'टीव्हीएस जुपिटर'चे नवे मॉडेल लॉन्च

मराठाच नव्हे, मुघलांनीही वापरलेला मार्ग होणार बंद; गोवा-कर्नाटकला जोडणारा केळघाट इतिहासजमा!

SCROLL FOR NEXT