टीम इंडीयाची आणखी एक कसोटी म्हणजेच यजमान इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून सुरू झाली आहे, पण पुन्हा एकदा लॉर्ड्सवरील पावसाने पुन्हा अडथळा आणला आहे. पावसामुळे नाणेफेकीलाही विलंब झाला. दरम्यान या सामन्याची नाणेफेक इंग्लंडने जिंकत फिल्डींग घेतली असुन फलंदाजीसाठी टीम इंडीया सज्ज झाली आहे. या टेस्टमॅचसाठी इंग्लंड संघात तीन बदल करण्यात आले आहेत. इंग्लंडच्या संघात क्रॉलीच्या जागी हमीद, स्टुअर्ट ब्रॉडच्या जागी वूड आणि लॉरेन्सच्या जागी मोईन अलीचा समावेश करण्यात आला आहे, तर शार्दुल ठाकूरच्या जागी फिट इशांत शर्माला इलेव्हनचा भाग बनवण्यात आले आहे.
जाणुन घ्या कोण दोन्ही संघांचे प्लेयींग इलेव्हन
भारत: रोहित शर्मा, लोकेश राहुल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कॅप्टन), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवींद्र जाडेजा, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.
इंग्लैंड: रोरी बर्न्स, डॉम सिबली, हसीब हमीद, जो रूट (कॅप्टन), जॉनी बेयरस्टो, जॉस बटलर (यष्टीरक्षक), मोइन अली, सैम करन, ऑली रॉबिन्सन, मार्क वुड, जेम्स एंडरसन.
पहिल्या कसोटी दरम्यानही पावसामुळे सामन्यात अडथळा निर्माण केला होता. लाखो भारतीय क्रिकेट प्रेमी या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत कारण, मागच्या सामन्यात भारतीय संघाला पावसामुळे खूप त्रास सहन करावा लागला होता.
इंग्लंडने त्यांचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू मोईन अलीला संघात परत बोलावले आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याचा शेवटचा दिवस पावसामुळे धुऊन गेल्यानंतर सामना अनिर्णित राहिला. इंग्लंडच्या फलंदाजांनी खराब कामगिरी केल्याने दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडने मोईनला संघात बोलावून फलंदाजी मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.