Basketball 
क्रीडा

National basketball championship: गोव्याचा पुरुष बास्केटबॉल संघ बाद फेरीत दाखल; गटात मिळवले अव्वल स्थान

Goa Basketball team: गोव्याच्या संघाने 73 व्या राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केल आहे.

किशोर पेटकर

National basketball championship:

गोव्याच्या पुरुष बास्केटबॉल संघाने क गटात अव्वल स्थान मिळवून 73व्या राष्ट्रीय सीनियर बास्केटबॉल स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. स्पर्धा पंजाबमधील लुधियाना येथे सुरू आहे.

एलिट (लेव्हल 1) गटातील स्थानासाठी आता गोव्यासमोर कर्नाटकचे मातब्बर आव्हान असेल. शेवटच्या साखळी लढतीत गोव्याने बुधवारी मिझोरामला 66-56 गुणफरकाने हरविले.

ऍरन ब्लेस्सन (16 गुण), यू. शिवा (11 गुण) व अखिल जेकब (8 गुण) यांनी गोव्याच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका वठविली. जेशुआ पिंटो (9 गुण) व महिपाल सिंग (10 गुण) यांचीही कामगिरी उल्लेखनीय ठरल्यामुळे ३ गुणांच्या बास्केटमध्ये गोव्याचा वरचष्मा राहिला.

विवेक गोटी, अखिल, जेशुआ यांना मिझोरामविरुद्ध खेळताना दुखापती झाल्या, त्यामुळे बलाढ्य कर्नाटकविरुद्ध खेळताना गोव्याचा कस लागणार आहे.

महिला गटात मेघालयाकडून 62-28 गुणफरकाने हार पत्करल्यामुळे गोव्याचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले. सारा हुसेन हिने 11, शिमेई नॅथन हिने 5 गुण नोंदविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खुनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

SCROLL FOR NEXT