Professional League Football Dainik Gomantak
क्रीडा

Professional League Football: पणजी फुटबॉलर्सच्या खाती पहिला गुण, दोन सामने निसटत्या फरकाने गमावले

गार्डियन एंजलविरुद्ध 1-1 गोलबरोबरी

किशोर पेटकर

Professional League Football प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत अगोदरचे दोन्ही सामने निसटत्या फरकाने गमावल्यानंतर पणजी फुटबॉलर्सने मंगळवारी पहिल्या गुणाची कमाई केली. त्यांनी गार्डियन एंजल स्पोर्टस क्लबला 1-1 असे बरोबरीत रोखून गुण विभागून घेतला.

म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर सामना झाला. तीन सामने खेळल्यानंतर पणजी फुटबॉलर्सचा आता एक गुण झाला आहे, तर अगोदरचे दोन्ही सामने जिंकलेल्या गार्डियन एंजलचे आता तीन लढतीनंतर सात गुण झाले आहेत.

सामन्याच्या पूर्वार्धात गोलरक्षक प्रेस्टन रेगो याने पेनल्टी फटक्याला गोलनेटची अचूक दिशा दाखविल्यामुळे पणजी फुटबॉलर्सचा आघाडी मिळाली.

नंतर सामन्यातील पाच मिनिटे बाकी असताना जॉयविन कॉस्ता याच्या गोलमुळे गार्डियन एंजलला स्पर्धेतील अपराजित मालिका कायम राखता आली.

पणजी फुटबॉलर्सने मिळालेल्या संधी साधल्या असत्या, तर त्यांना स्पर्धेतील पहिला विजय नोंदविणे शक्य झाले असते. गार्डियन एंजल क्लबचा अक्रम यादवड सामन्याचा मानकरी ठरला.

स्पर्धेत बुधवारी (ता. १३) वास्को स्पोर्टस क्लब व सेझा फुटबॉल अकादमी यांच्यात धुळेर स्टेडियमवर सामना होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tejas Kolvekar: अभिमान! फोंड्याच्या 'तेजस'ची सैन्य दलात कॅप्टन पदावर नियुक्ती; उत्तर प्रदेशात रायबरेली येथे तैनात

Goa Crime: ‘पारधी’ टोळीच्या म्होरक्यास वास्कोत अटक! पोलिसांची कारवाई; जुने गोवे, पेडण्यातील गुन्ह्यांचा छडा

French Chef Death: हॉटेलमध्ये आढळला फ्रेंच हेड शेफचा मृतदेह; 3 वर्षांपासून एकटा राहत असल्याची माहिती

Ram Mandir Movie: 'आपण मूळचे हिंदू! राममंदिराच्या लढ्याचा इतिहास मांडणार'; मंत्री गुदिन्‍होंनी सिनेमाबद्दल दिली माहिती

U19 Chess Competition: मंदार, श्रिया यांना बुद्धिबळ विजेतेपद! राज्यस्तरीय 19 वर्षांखालील स्पर्धेत अपराजित घोडदौड

SCROLL FOR NEXT