Captain Ibtisam Shaikh Dainik Gomantak
क्रीडा

तमिळनाडू विरुद्धही गोव्याचा पराभव

स्पर्धेत गोव्याचा पाच लढतींमधील चौथा पराभव

Dainik Gomantak

पणजी: गोव्याची कर्णधार इब्तिसाम शेख (Captain Ibtisam Shaikh) हिने लढवय्या पारी साकारताना ४६ धावांची खेळी केली. १९ वर्षांखालील मुलींच्या (U-19 women's cricket) एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेच्या एलिट ब गटातील तमिळनाडूविरुद्धच्या पराभवात गोव्याला (Goa Cricket Association) तेवढाच काय तो दिलासा मिळाला.

जामठा-नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या (GCA) स्टेडियमवर सोमवारी तमिळनाडूने (Tamil Nadu) गोव्याला पाच विकेट्स राखून सहजपणे नमविले. स्पर्धेतील गोव्याचा हा पाच लढतीतील चौथा पराभव ठरला. त्यामुळे गोवा संघ केवळ दोन गुणांसह शेवटच्या क्रमांकावर राहिले.

गोव्याने स्पर्धेत प्रथमच शतकी वेस ओलांडताना ८ बाद ११३ धावा केल्या. त्यात सलामीच्या इब्तिसाम हिने तनया नाईक (३४) हिच्यासह तिसऱ्या विकेटसाठी केलेली ६१ धावांची भागीदारी महत्त्वपूर्ण ठरली. या दोघींचा अपवाद वगळता गोव्याच्या इतर फलंदाज दुहेरी धावसंख्या देखील गाठू शकल्या नाहीत.

तमिळनाडूने २७.४ षटकांत ५ बाद ११४ धावा करून सामना सहजरित्या खिशात टाकला. तामिळनाडूच्या एम. एस. ऐश्वर्या हिने नाबाद ४६, तर सलामीच्या सी.सुशांतिका हिने ३९ धावा केल्या. गोव्यातर्फे तानिया पवार हिने दोन गडी बाद केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"गोव्यात हे चाललंय काय?", 450 रुपयांच्या टॅक्सी स्कॅममधून सुटलो, पोलिसांनी 500 रुपये घेतले; जर्मन इन्फ्लुएंसरचा Video Viral

7th Pay Commission Goa: सातवा वेतन आयोग लागू करा! गोव्यातील पंचायत कर्मचाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Ratnagiri: 'समुद्रस्नान' जीवावर बेतलं!गणपतीपुळे समुद्रात तीन पर्यटक बुडाले; एकाचा मृत्यू, दोघांना वाचवण्यात यश

Anaya Bangar Viral Video: ट्रान्सजेंडर क्रिकेटर अनाया बांगरचं दमदार कमबॅक, RCB ची किट बॅग घेऊन केली प्रॅक्टिस, WPL मध्ये खेळणार?

प्रभुदेसाईंच्या आंदोलनानंतर कृषी विभागाचे आश्वासन; भातकापणीसाठी देणार नवीन यंत्र

SCROLL FOR NEXT