शुभम तारी Dainik Gomantak
क्रीडा

कर्नल सी. के. नायडू करंडकमध्ये गोव्याची दमदार सुरवात

मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमने 5 विकेट टिपल्या.

Kishor Petkar

पणजी: वेगवान शुभम तारी याने कर्नल सी. के. नायडू करंडक (25 वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धेतील पदार्पण दाहक ठरले. त्याची झळ हिमाचल प्रदेशला बसली आणि त्यांचा पहिला डाव दोनशे धावांच्या आत गारद झाला.  मोसमातील पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमने 5 विकेट टिपल्या. (Goa gets off to a strong start in the Colonel C K Naidu Trophy)

एलिट एफ गटातील चार दिवसीय सामन्याला मंगळवारी अळूर-बंगळूर येथे सुरवात झाली. शुभमने 42 धावांत 5 गडी बाद केले. त्याच्या धारदार माऱ्यासमोर हिमाचल प्रदेशची मध्यफळी कोसळली. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना त्यांचा पहिला डाव 193 धावांत संपुष्टात आला. नंतर वैभव गोवेकर (36) व मंथन खुटकर (नाबाद 42) यांनी दिलेल्या 75 धावांच्या सलामीमुळे गोव्याने पहिल्या दिवसअखेर 1 बाद 92 धावा केल्या. ते अजून 101 धावांनी मागे आहेत.

कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या शुभमने संधीचा पूरेपूर लाभ उठविला. बिनबाद 41 सलामी दिलेल्या हिमाचल प्रदेशला पहिला दणका त्यानेच दिला. नंतर 8 धावांत 4 विकेट्स गमावल्यामुळे हिमाचल प्रदेशची 7 बाद 107 अशी दाणादाण उडाली. डावातील 28व्या षटकात दुसऱ्या व तिसऱ्या चेंडूवर सलग विकेट घेतल्यानंतर शुभमला हॅटट्रिकची संधीही प्राप्त झाली होती. कर्णधार एस. जी. अरोरा (36) याने तळाच्या फलंदाजांसह खिंड लढविली. त्यांच्या अखेरच्या तीन विकेटकडून धावसंख्येत 86 धावांची भर पडली. अरोरा व जयशोधन ठाकूर (32) यांनी आठव्या विकेटसाठी 43 धावांची भर टाकली.

लक्षवेधक शुभम

शुभम तारी याने 2019-20 मोसमात गोव्यातर्फे कुचबिहार करंडक (19 वर्षांखालील) स्पर्धेत छाप पाडली होती. सिक्कीम (5-31) व नागालँडविरुद्ध (5-19) त्याने डावात 5 गडी बाद करण्याची किमया साधली. गतमोसमात वयोगट स्पर्धा झाली नाही. यंदा त्याने रणजी करंडक स्पर्धेसाठी निवडलेल्या गोव्याच्या संघातील राखीव खेळाडूंत स्थान मिळविले होते. आता कर्नल सी. के. नायडू स्पर्धेच्या पदार्पणाच्या डावात 5 गडी बाद करण्याचा पराक्रम साधला.

संक्षिप्त धावफलक

हिमाचल प्रदेश, पहिला डाव ः 57.2 षटकांत सर्वबाद 193 (कुशल पाल 12, पी. जे. सिंग 35, एस. आर. पुरोहित 31, एस. जी. अरोरा 36, जयशोधन ठाकूर 32, एन. के. कंवर 30, ऋत्विक नाईक 16.2-3-48-1, शुभम तारी 11.5-3-42-5, मोहित रेडकर 12-2-48-2, दीपराज गावकर 12.1-3-31-0, विश्वंबर काहलोन 5-0-22-2).

गोवा, पहिला डाव ः 32 षटकांत 1 बाद 92 (वैभव गोवेकर 36, मंथन खुटकर नाबाद 42, कश्यप बखले नाबाद 12, रितिक कुमार 1-19).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

Viral Video: 'खतरों के खिलाडी' वाली स्टंटबाजी, पठ्ठ्याचा सोशल मीडियावर व्हिडिओ तूफान व्हायरल; नेटकरी म्हणाले...

SCROLL FOR NEXT